10 PS पेक्षा जास्त शक्ती असलेली 125 सीसी विभागातील एकमेव स्कूटर; ड्युएल राईड मोड्स असलेली एकमेव आयसी इंजिन स्कूटर; अतिशय अनोख्या आणि अशा प्रकारच्या पहिल्याच व्हॉइस असिस्ट वैशिष्ट्याचा समावेश
होसूर : दुचाकी व तीनचाकी गाड्यांची जगद्विख्यात उत्पादक कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने TVS NTORQ 125 Race XP बाजारपेठेत दाखल करत असल्याची घोषणा केली आहे.
TVS NTORQ 125 ने भारतीय स्कूटर उद्योगक्षेत्रात कनेक्टिव्हिटी, शक्ती आणि स्टाईल यांच्या नव्या युगाचा प्रारंभ केला आहे. त्याला पुन्हा नव्याने परिभाषित करण्यासाठी TVS NTORQ 125 Race XP सज्ज आहे. याच्या स्मार्टक्सोनेक्ट (SMARTXONNECTTM) कनेक्टिव्हिटी प्लॅटफॉर्मवर क्रांतिकारी तंत्रज्ञान उपयोगात आणले गेले आहे, राईड मोड्ससह ही स्कूटर म्हणजे नवी ड्राईव्ह ट्रेन आहे, त्याशिवाय अतिशय हलके वजन ही TVS NTORQ 125 Race XP ची वैशिष्ट्ये आहेत.
| ठळक वैशिष्ट्ये
• 7००० आरपीएमला 10.2 PS • व्हॉइस असिस्ट • रेस व स्ट्रीट मोड • टीव्हीएस कनेक्ट ऍपसाठी नवीन युआय/युएक्स • रेसपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेली रंगसंगती • रेसपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेले ग्राफिक्स • रंगीत व्हील्स |
कनेक्टेड मोबिलिटीसाठीचा मार्ग याआधीच खुला केल्यानंतर आता TVS NTORQ 125 Race XP आणि याच्या स्मार्टक्सोनेक्ट (SMARTXONNECTTM) कनेक्टिव्हिटी प्लॅटफॉर्मसह टीव्हीएस मोटर कंपनीने अतिशय अनोख्या आणि अशा प्रकारच्या पहिल्याच व्हॉइस असिस्ट वैशिष्ट्यासह उद्योगक्षेत्रात नवा मापदंड रचला आहे. मोड चेंज, नेव्हिगेशन, कन्सोल ब्राईटनेस ऍडजस्टमेंट आणि डीएनडी यासारखी विविध कनेक्टिव्हिटी फंक्शन्स यामध्ये आहेत. भारतीय दुचाकी उद्योगक्षेत्रात कनेक्टेड मोबिलिटीच्या आधुनिक मार्गावर नवे मापदंड ही स्कूटर सादर करत आहे. इतकेच नव्हे तर, 10 PS पेक्षा जास्त शक्ती असलेली ही 125 सीसी विभागातील एकमेव स्कूटर आहे. गॅस फ्लो डायनॅमिक्स आणि कम्बस्चनमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्यामुळे या स्कूटरची पॉवर डिलिव्हरी देखील वाढली आहे. नव्या टॉगल राईड मोड्समुळे रायडरला आपल्या गाडीकडून मागणीप्रमाणे अतिरिक्त डिलिव्हरी मिळवता येते. सुधारित इंजिनीयरिंग पॉलिमर्स, अधिक जास्त मजबूत स्टील आणि अलॉय स्टील यांचा वापर करण्यात आल्यामुळे TVS NTORQ 125 Race XP वजनाला हलकी झाली आहे, ज्यामुळे तिच्या कामगिरीत व ड्राइव्ह कोशंटमध्ये वाढ झाली आहे.
नव्या स्कूटरच्या शुभारंभप्रसंगी कम्युटर, मोटरसायकल्स, स्कुटर्स अँड कॉर्पोरेट ब्रँडचे व्हाईस प्रेसिडेंट (मार्केटिंग) श्री. अनिरुद्ध हलदर यांनी सांगितले, “भारतात स्कूटरकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांमध्ये TVS NTORQ 125 मुळे नवे बदल घडून आले, कायम कनेक्टेड राहणाऱ्या जेन झेडसाठी आकर्षक, शक्तिशाली आणि कनेक्टेड स्कूटरचे नवे युग या गाडीच्या रूपाने अवतरले. आणि आता TVS NTORQ 125 Race XP भारतीय बाजारपेठेत दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या प्रकारच्या स्कूटर विभागातील सर्वात जास्त शक्ती, या विभागात पहिल्यांदा आणले जात असलेले ड्युएल राईड मोड्स, अधिक जास्त सर्वाधिक वेग क्षमता आणि उत्तम ऍक्सिलरेशन यांनी परिपूर्ण अशी ही नवी TVS NTORQ 125 Race XP आहे. अभियांत्रिकीमध्ये सातत्यपूर्ण संशोधन, सुधारणा करण्याच्या आणि ग्राहकांना अधिक जास्त समाधान व आनंद मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. इंजिन ब्रीदिंग, कम्बस्चन ऑप्टिमायजेशन आणि सुधारित अभियांत्रिकी पॉलिमर्स, संगणकाच्या साहाय्याने डिझाईन सिम्युलेशन्सचा लाभ मिळवून देणारे अधिक जास्त मजबूत स्टील व इतर धातूंचा उपयोग यासारख्या अभियांत्रिकी सुधारणांचे लाभ या स्कूटरमध्ये मिळवता येतात. टीव्हीएस स्मार्टक्सोनेक्ट (SMARTXONNECTTM) कनेक्टिव्हिटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करवून देण्यात आलेल्या, या उद्योगक्षेत्रात प्रथमच सादर केल्या जात असलेल्या व्हॉइस असिस्टमुळे तुमची एनटीओआरक्यू तुमच्या कमांड्सना प्रतिसाद देते. लाल अलॉयसह नवा लूक या सर्व अत्याधुनिक वैशिष्ट्यांना साजेसा आहे. ‘ऑलवेज ऑन‘ असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या जेन झेड अर्थात आजच्या नव्या पिढीला श्रेणीतील सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी आणि वाहन वैशिष्टये आणि त्यासोबत विभागात प्रथमच 10.2 PS शक्ती यांचा हा आकर्षक, अनोखा मिलाप नक्कीच आवडेल.”
तंत्रज्ञान
TVS NTORQ 125 मध्ये टीव्हीएस स्मार्टक्सोनेक्ट (SMARTXONNECTTM) हे नाविन्यपूर्ण ब्ल्यूटूथ सक्षम तंत्रज्ञान आहे. त्याला खास टीव्हीएस कनेक्ट मोबाईल ऍपची साथ आहे जे अँड्रॉइड व आयओएस प्लॅटफॉर्म्सवर वापरता येते. TVS NTORQ 125 Race XP मध्ये व्हॉइस असिस्ट वैशिष्ट्यामुळे या संवादात्मक अनुभवामध्ये लक्षणीय वाढ होते, ग्राहक त्यांच्या स्कूटरसोबत व्हॉइस कमांड्समार्फत जोडले जाऊ शकतात. या ऍपवर आता 15 पेक्षा जास्त वेगवेगळ्या व्हॉइस कमांड्स स्वीकारल्या जातात, यामध्ये नेव्हिगेशन लॉन्चिंगपासून मोड्स बदलण्यापर्यंत सर्व कमांड्स कोणत्याही कनेक्टेड ब्ल्यूटूथ लिसनिंग डिव्हाईसमार्फत दिल्या जाऊ शकतात. टीव्हीएस स्मार्टक्सोनेक्ट (SMARTXONNECTTM) आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी सज्ज तंत्रज्ञानामुळे आता रायडर्स विविध सेटिंग्सचे नियंत्रण रोडवर असताना केवळ आवाजामार्फत करू शकतात. टीव्हीएस कनेक्ट ऍप अपडेट करण्यात आले असून यामध्ये नवे युआय आणि युएक्स आहे. याचा राईड मोडवर आधारित लाईव्ह डॅशबोर्ड ग्राहकांच्या रायडींग स्टाईलला साजेसा आहे. बाईक ओव्हरव्ह्यू सेक्शनमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या असून आता कामगिरी निकषांचे ग्राफिकल सादरीकरण पाहता येते. नेव्हिगेशन फंक्शनमध्ये आता अत्यावश्यक सेव्ह ऍड्रेस फंक्शन देखील समाविष्ट करण्यात आले आहे त्यामुळे नियमित मार्गांवर नेव्हिगेट करणे जास्त सोपे बनले आहे.
कामगिरी
टीव्हीएस रेसिंगचा वारसा चालवणाऱ्या TVS NTORQ 125 ची कामगिरी अतिशय दमदार आहे. TVS NTORQ 125 Race XP मध्ये रेस ट्यून्ड फ्युएल इंजेक्शन (आरटी-एफआय) इंजिन आहे जे 5500 आरपीएम टॉर्कला 10.8 एनएम शक्ती देते. रेस मोड आणि स्ट्रीट मोड या दोन रायडींग मोड्सपैकी आपल्या आवडीचा मोड निवडण्याचे स्वातंत्र्य रायडर्सना मिळते व हा बदल फक्त एक स्विच दाबून करता येतो. रेस मोडमध्ये रायडर्सना महामार्गांवर ताशी 98 किमी सर्वाधिक वेगाचा आणि उत्तम ऍक्सिलरेशनचा अनुभव घेता येतो. स्ट्रीट मोड शहरांमधील रस्त्यांवर, दाट वाहतुकीसाठी योग्य ठरतो. हा मोड ऍक्टिव्ह केल्यानंतर मायलेज वाढवतो आणि सुरळीतपणे रायडिंगचा अनुभव मिळवून देतो.















