‘रेड अँड ब्लॅक’ आणि ‘ब्लू अँड ब्लॅक’ ही कलर थीम क्लासिक मोटरसायकल जगतातून प्रेरित.
होसूर, ६ जानेवारी २०२२:दुचाकी व तीनचाकी वाहनांचे उत्पादन करणाऱ्या टीव्हीएस मोटर कंपनी याजगातील नामांकित कंपनीने ‘टीव्हीएस रेडियन’हे मोटरसायकलचे मॉडेल दोन नवीन ‘ड्युअल टोन’ रंगांमध्ये सादर केले आहे. ‘रेड अँड ब्लॅक’ आणि ‘ब्लू अँड ब्लॅक’ या रंगांची ही थीम क्लासिक मोटरसायकलींच्या जगतापासून प्रेरित आहे. ग्राहकांसाठी ‘ड्युअल टोन’ पर्याय सादर करणारी ही या विभागातील पहिली मोटरसायकल आहे. २०१८मध्ये सादर झाल्यापासून‘टीव्हीएस रेडियन’ने ग्राहकांना उत्कृष्ट कामगिरी, सर्वोत्कृष्ट श्रेणीतील वैशिष्ट्ये आणि मजबूत ग्राहक-केंद्रित डिझाइन याआपल्या वैशिष्ट्यांतून नेहमीच आनंद दिला आहे. वाढीव टिकाऊपणाव्यतिरिक्त, या ब्रँडच्या मोटरसायकली आपल्या अद्वितीय उद्योग-प्रथम शैलीसाठी ओळखल्या जातात. त्यातून ग्राहकांसाठी मूल्य प्रस्ताव निर्माण होतो. नवीन ‘ड्युअल टोन’ची ही आवृत्ती ग्राहकांच्या आनंदात आणखी भर घालणार आहे.
‘टीव्हीएस रेडियन’मध्ये ‘नेक्स्ट-जनरेशन इकोथ्रस्ट फ्युएल इंजेक्शन’ (इटी-एफआय) हे तंत्रज्ञान आहे. यामुळे या गाडीचे मायलेज १५ टक्क्यांनी जास्त येते, तसेच इंजिनचे कार्यप्रदर्शनही अधिक चांगले मिळते, इंजिनचा टिकाऊपणा वाढतो आणि चालकाला नितळ रायडिंगचा अनुभव येतो. मजबूत मेटल बिल्ड, दणकट शैली आणि आलिशान स्वरुपाचा आराम ही या मोटरसायकलीची आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.
‘टीव्हीएस रेडियन ड्युअल टोन’ ही मोटरसायकल ‘प्रीमियम क्रोम हेडलॅम्प’, नवीन ‘क्रोम रिअर व्ह्यू मिरर’, ‘प्रीमियम डॅशबोर्ड’, नवीन ‘फ्रंट डिस्क ब्रेक्स’, नवीन मजबूत ‘थाय पॅड डिझाइन’ आणि लांबच्या प्रवासासाठी उपयुक्त असे ‘प्रीमियम कुशन सीट’ यांसारख्या रोमांचक नवीन वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. वर्धित स्थिरता आणि आराम यांसाठी ‘क्रोम श्राऊड’सह ‘सॉलिड रीअर सस्पेंशन’आणि ‘ड्युराग्रिप टायर्स’सह १८ इंचीमोठी चाके यांसारखी सर्वोत्कृष्ट श्रेणीची वैशिष्ट्येही या गाडीमध्ये मिळतात. सीटची परिपूर्ण उंची, मोठा ‘ग्राउंड क्लीयरन्स’, लांब ‘व्हील-बेस’यांमुळे या गाडीच्या चालकाला रायडिंगचा अनुभव अखंडपणे मिळतो. तसेच, ‘यूएसबी चार्जिंग स्पॉट’, सोयीस्कर पद्धतीचा ‘ऑल-गियर सेल्फ-स्टार्ट’, बीपर असलेला ‘साइड स्टँड इंडिकेटर’ आणि ‘पिलियन ग्रॅब-रेल’ यांसारख्या अतिशय सुलभ अशा सुविधांमुळेही चालकाला गाडी हाताळण्याचा उत्तम अनुभव येतो.
‘टीव्हीएस रेडियन’च्या ‘इलेक्ट्रिक स्टार्ट एमएजी ड्रम ब्रेक व्हेरियंट’ची प्रारंभिक किंमत65,782 रु. (एक्स-शोरूम महाराष्ट्र) आहे, तर ‘इलेक्ट्रिक स्टार्ट एमएजी डिस्क ब्रेक व्हेरियंट’मधील ‘ड्युएल टोन एडिशन’ची किंमत 72,732 रु. (एक्स-शोरूम महाराष्ट्र) आहे.
| मॉडेल (बीएस-VI) | प्रकार | किंमत रु. (एक्स-शोरूम महाराष्ट्र) | उपलब्ध रंग |
| मूळ एडिशन | इलेक्ट्रिक स्टार्ट एमएजी ड्रम | रू.65,782 | रॉयल पर्पल, पर्ल व्हाईट, गोल्डन बीज, मेटल ब्लॅक, टायटॅनियम ग्रे, व्होल्कॅनो रेड, रीगल ब्ल्यू |
| ड्युएल टोन एडिशन | इलेक्ट्रिक स्टार्ट एमएजी ड्रम | रू.69,732 | रेड अॅंड ब्लॅक, ब्ल्यू अॅंड ब्लॅक |
| ड्युएल टोन एडिशन | इलेक्ट्रिक स्टार्ट एमएजी डिस्क | रू.72,732 | रेड अॅंड ब्लॅक, ब्ल्यू अॅंड ब्लॅक |















