मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी तुळशी तलाव सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला आहे. गतवर्षी हा तलाव १९ जुलै रोजी भरला होता.
मुंबईला सात धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी मोडकसागर, तानसा मागील महिन्यात ओसंडून वाहू लागले आहेत. रविवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज तुळशी तलाव भरुन वाहू लागला आहे. मुंबईला वर्षभरासाठी १४ लाख ३६ हजार ३६७ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता भासते. सधस्थितीत सात ही तलावात मिळून १२ लाख ८९ हजार ९०७ दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे.