
मुंबई, (निसार अली) : लाईट ऑफ होप फाऊंडेशन आणि भाकर फाऊंडेशन मुंबईच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथील 55 तृतीयपंथी, जोगती यांना महिनाभर पुरेल इतके जिवनावश्क वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाउनमुळे प्रभावित इतर व्यकतींसह तृतीयपंथींयांचे ही हाल होत असल्याने त्यांनाही मदत करण्याची गरज आहे, असे मत दिपक सोनावणे व जॉन्सन एबेनेझर यांनी व्यक्त केले.