
मुंबई : सेकंडहँड वाहनाची खरेदी करण्यासोबतच त्याच्या गुणवत्ता आणि कार्यक्षमतेच्या बाबतीत स्वत:च्या अशा समस्याही येतात. याचे समाधान करण्यासाठी,सेकंडहँड कार खरेदी आणि विक्रीसाठी भारतातील अग्रगण्य ओमनी-चॅनेल प्लॅटफॉर्म ट्रूबिलने रोड साइड असिस्टन्स (आरएसए) नामक विक्री-पश्चात सुविधा सादर केली आहे. यामुळे आपल्या ग्राहकांसाठी विशेषतः पावसाळी हंगामात मुंबईसारख्या मान्सून-प्रभावित शहरांमध्ये एक चांगला उपाय म्हणून ही सेवा लोकप्रिय होत आहे.
ग्राहक ट्रूबिलकडून सेकंडहँड कार खरेदी करतो, तेव्हा ब्रँड त्यांना अनिवार्यपणे १ वर्षाचे रोडसाइड सहाय्य प्रदान करते. १५०० रूपयांच्या नाममात्र शुल्कात संपूर्ण वर्षासाठी वैध असलेल्या आरएसएचा सेवेचा लाभ कॉल केल्यानंतर १ तासांच्या आत नियुक्त सेवा प्रदाता निश्चितपणे उपस्थित होण्याच्या हमीद्वारे घेता येतो. ट्रुबिल सदस्य म्हणून ग्राहक बॅटरी तपासणी आणि जंप स्टार्ट, किरकोळ यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल तपासणी, चाक बदलणे, इंधन व्यवस्था आणि की लॉकआउट सहाय्य, किरकोळ क्लच आणि ब्रेक समायोजन, रस्त्यावर किरकोळ बिघाड होणे आणि २० किलोमीटरपर्यंत टोइंग सहाय्य यासारख्या सेवांसाठी पात्र आहे. शिवायगंभीर नुकसान झाल्यास, ब्रँड आपल्या ग्राहकांना विम्याचा दावा करण्यास देखील मदत करते. आरएसएसाठी साइन अप केल्यानंतर, ग्राहक या सर्व सहाय्य सेवा एका वर्षात ५ वेळा विनामूल्य घेऊ शकतात.
ट्रुबिलचे सहसंस्थापक शुभ बंसल यांनी सांगितले की, ‘ट्रुबिलमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांच्या सुविधेला आमचे सर्वोच्च प्राधान्य मानतो. आमच्या रोडसाइड सहाय्य सुविधेद्वारेआम्ही आमच्या ग्राहकांना अनपेक्षितपणे वाहन बिघडण्याच्या समस्येचा सामना करताना आमचे सर्व सहाय्य प्रदान करू इच्छितो. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सेकंडहँड कारच्या सर्व गरजांसाठी वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून आमची गुणवत्ता सिद्ध करू अशी आम्हाला आशा आहे.”














