रत्नागिरी, (आरकेजी) : भरधाव ट्रकवर वडाचे मोठे झाड कोसळून झालेल्या अपघातात क्लिनर जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री राजापूर तालुक्यातील रायपाटण टक्केवाडीत ही घटना घडली. अपघातामुळे रायपाटणमार्गे कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक सात तास बंद होती.
ट्रकचालक अमित सावंत पेणहून गणपती घेऊन ट्रकमधून पाचलला जात होते. याचवेळी रात्री साडेदहाच्या सुमारास रायपाटणजवळ एक जुना आणि धोकादायक वड ट्रकवर पडला आणि ट्रकचा क्लिनर मंदार लटके जागीच ठार झाला, तर चालक अमित सावंत गंभीर जखमी झाले. त्याना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे दोघेही चिपळूण तालुक्यातल्या पाग येथील राहणारे आहेत.