~ एलजीबीटीक्यूआयए+ कम्युनिटीतील क्रिएटर्सच्या यश-कथांवर प्रकाशझोत टाकणार ~
मुंबई, ९ जून २०२१: जगभरातील एलजीबीटीक्यूआयए+ कम्युनिटीसाठी जून महिना अत्यंत खास आहे. हा प्राइड मंथ म्हणजेच स्वत:ची ओळख आणि प्रेमाच्या उत्सवाच्या रुपात साजरा केला जातो. या समुदायासाठी हे महत्त्वपूर्ण असून, यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारतासहित अनेक देशांतील लोक मनासिकता बदलण्यासाठी योग्य दिशेने पावले उचलत आहेत. त्यामुळे हा महिना केवळ उत्सवच नव्हे तर एलजीबीटीक्यूआयए+ संबंधी सर्व धारणांबाबत जागरूकता निर्माण करण्याची मोहीमही राबवली जाते. या पार्श्वभूमीवर भारतातील पहिल्या क्रमांकाचा लाइफस्टाइल व्हिडिओ आणि शॉपिंग अॅप असलेल्या ट्रेलने ‘प्राईड ऑफ ट्रेल’ हे महिनाभर चालणारे अभियान सुरु केले आहे.
एलजीबीटीक्यूआयए+ समुदायातील यशस्वी लोकांच्या कथांची एक सीरीज शेअर केली जाईल. त्यात एलजीबीटीक्यूआयए+ संबंधी रुढी आणि जागरुकता निर्माण करणे तसेच सर्वसाधारण चुकीच्या समजांविषयीच्या प्रश्नांना उत्ततर देण्यासाठी क्रिएटर्स उपलब्ध असतील. प्राइड मंथविषयी एंगेजमेंट आणि संवाद वाढवण्यासाठी तीन पोल्स घेतले जातील. सर्व स्तरांतील लोकांना एकत्र आणणे आणि लिंग वगळता मानवीय मूल्यांवर भर देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
परेडमध्ये परफॉर्म करणाऱ्या किंवा बोलणाऱ्या लोकांच्या परेडमधील वैशिष्ट्यांविषयी माहिती सांगितली जाईल तसेच त्याची झलक दर्शवली जाईल. प्राइड परेडमध्ये हरीश अय्यर, श्रीधर रंगायन आणि सागर गुप्ता, नीलाक्षी रॉय आणि अप्सरा रेड्डी यासारख्या प्रमुख व्यक्ती, प्रमुख वक्ते किंवा पॅनलिस्टच्या रुपात सहभागी असतील. महिनाभर चालणाऱ्या या मोहिमेची समाप्ती व्हर्चुअल लाइव्ह प्राइड परेडने होईल, इच्छुक यूझर्सना रजिस्ट्रेशन लिंकवर रीडायरेक्ट केले जाईल, जेथून ते आरएसव्हीपी करू शकतात आणि लाइव्ह पाहू शकतात.