~ विविध उत्पादनांवर ग्राहकांना मिळणार ७०% पर्यंत सवलत ~
मुंबई, 10 ऑगस्ट : ट्रेल या भारतातील सर्वात मोठ्या लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मने ट्रेल शॉपच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त महिनाभराचा बिग बॅश सेल आयोजित केला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत चालणा-या या सेलमध्ये वॉव, लॅकमे, प्लम, एम कॅफिन, गार्निअर, लॉरिअल, ममा अर्थ, मेबिलाइन, बॉम्बे शेविंग कंपनी आणि इतर अनेक वेलनेस व ब्युटी ब्रँडस ग्राहकांना १५ % ते ७०% पर्यंत सवलत देत आहेत. ग्राहकांनी २५०० रुपयांची खरेदी केल्यास त्यांना २००० रुपये किंमतीचा ब्युटी बॉक्सदेखील मिळू शकतो. या ब्युटी बॉक्समध्ये लॅकमे, गार्निअर, मिरॅबेल इत्यादीसारख्या ब्रँड्सची उत्पादने आहेत.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ट्रेलने सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म लाँच केला. या प्लॅटफॉर्मवर ब्युटी आणि वेलनेस श्रेणीतील विविध ब्रँड्स उपलब्ध आहेत. ट्रेल शॉपद्वारे ग्राहकांना दैनंदिन जीवनशैलीविषयक गरजा भागवणारी उत्पादने प्रदान केली जातात. ट्रेलच्या प्लॅटफॉर्मवर ६०० ब्रँड्स उपलब्ध आहेत. तसेच माता व बालकाची काळजी, फॅशन आणि गृहसजावटीची उत्पादने पुढील काही महिन्यात समाविष्ट करण्याची योजना आहे.
भारतातील पहिला मोबाइल आधारीत व्हिज्युअल ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मच्या स्वरुपात स्थापन केलेला ट्रेल आज देशातील सर्वात मोठा लाइफस्टाइल सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म असून तो लाखो लोकांना प्रादेशिक भाषांमध्ये प्रासंगिक आणि सार्थक सामग्री बनवणे तसेच पाहण्यास सक्षम करतो. प्लॅटफॉर्म ४५ दशलक्ष+ मासिक सक्रिय यूझर्स आणि १०० दशलक्षपेक्षा जास्त डाउनलोड्ससह वेगाने विकसित झाला आहे.