नवी मुंबई : दिघा येथील सुल्झर पंप्स इंडिया प्रा. कंपनीतर्फे देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपणाची मोहिम घेण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत कंपनीच्या बाहेरील रस्त्यावरील दुभाजकामध्ये 56 झाडे लावण्यात आली. या मोहिमेत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. सुजल शहा, एच.आर., आय.आर. डिपार्टमेंटचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. गुरुलालसिंग उप्पल, सुल्झर पंप्स एम्प्लॉईस युनियनचे अध्यक्ष श्री. रुपेश पवार, जनरल सेक्रेटरी श्री. संजय आंब्रे, सेफ्टी डिपार्टमेंटचे राम काळके व कंपनीचे कामगार कर्मचारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.