मुंबई : पर्यटनविषयक जगातील आघाडीचे आणि तमिळ व १० इतर भारतीय भाषा तसेच आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये लाखो प्रेक्षक मिळवत असलेले चॅनेल ट्रॅव्हल एक्सपी कॅनडामध्ये २४तास टीव्ही चॅनेल लाँच करण्यासाठी सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे, हे चॅनेल जगातील आघाडीचे ब्रॉडकास्ट फॉरमॅट फोर के एचडीआर मध्ये लाँच करण्यात येणार आहे. ही सेवा गुरुवार २६ जुलै २०१८ रोजी कॅनडाच्या टेलस नेटवर्कवर लाँच करण्यात येणार असून त्यामुळे ट्रॅव्हलएक्सपी २६ देशांतील ९२ दशलक्ष घरांत दिसणार आहे.
प्रशांत चोथानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ट्रॅव्हलएक्सपी म्हणाले, की कॅनडातील प्रेक्षकवर्गाला त्यांचे पहिले २४ तास चालणारे फोर के एचडीआर चॅनेल देताना आम्हाला अभिमान वाटत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वाधिक पैसा खर्च करणारे म्हणून ओळखले जाणारे कॅनेडियन पूर्णपणे फोर के फॉरमॅटमध्ये जागतिक दर्जाचा, अस्सल पर्यटनविषयक कंटेटचा आनंद घेतील अशी आशा वाटते.
कॅनडातील टेलस टीव्ही ग्राहकांना ट्रॅव्हलएक्सपी फोर के साठी अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. २६ जुलै २०१८ पासून ट्रॅव्हल एक्सपीचा मोफत प्रीव्ह्यू पाहता येईल. जागतिक फोर के वितरक व्हिव्हिकास्ट मीडियाची टोरॅंटोस्थित कॅनेडियन विक्री आणि विपणन कंपनी व्हिव्हिकास्ट मीडिया कॅनडाने ट्रॅव्हलएक्सपीला टेलस टीव्हीया टेलस कंपनीसाठी २४x७ लिनियर फोर के चॅनेल म्हणून परवाना दिला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच सिंगापूर येथे स्टारहब नेटवर्कवर ट्रॅव्हलएक्सपी आपल्या जागतिक दर्जाच्या बहुसांस्कृतिक कंटेंटसह लाँच करण्यात आले होते आणि त्यापूर्वी एप्रिलच्या अखेरीस इंग्लंडचा सर्वात मोठा प्लॅटफॉर्म फ्रीव्ह्यूवरही लाँच करण्यात आले होते.
ट्रॅव्हलएक्सपी फोर के एचडीआर तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक आघाडीवर असून जगातील पहिले फोर के एचडीआर चॅनेल आहे. चॅनेलवरील सर्व शोज अंतर्गत निर्मिती असलेले आणिजागतिक प्रेक्षकांच्या आवडीनुसार बनवण्यात आलेले आहेत. ट्रॅव्हलएक्सपीचे लोकप्रिय शोज डेस्टनेशन, जीवनशैली, खाद्यपदार्थ, संस्कृती, निसर्ग आणि वारसा या सहाविभागांतील असून ते टेलस नेटवर्कवरील एक दशलक्ष घरांत उपलब्ध होणार आहेत.
ट्रॅव्हलएक्सपीची मालकी असलेली कंपनी भारतातील आघाडीचे संगीतविषयक चॅनेल्स– म्युझिक इंडिया, संगीत बांग्ला, संगीत मराठी, संगीत भोजपुरी आणि बांग्ला टॉकीजही प्रसारित करते.