सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीचा सर्वोत्तम सामना करण्यात दिल्लीकर दुसऱ्या क्रमांकावर
मुंबई : टीआरए रिसर्च या कन्झ्युमर इन्साइट्स व ब्रँड अॅनालिटिक्स कंपनीने 16 शहरांतील 902 शहरी नागरिकांच्या मदतीने नुकत्याच तयार केलेल्या सर्वेक्षण अहवालातील, भारतातील शहरांतील नागरिकांच्या मेंटल वेलबीइंगवर मंथन करणारे नवीन निष्कर्ष आज जाहीर केले आहेत. कुटुंबीयांचे आरोग्य व व कामाच्या बाबतीतील स्थिरता आणि देशाच्या आरोग्यावर व अर्थकारणावर होणारा परिणाम या भीतींचा सामना करण्याच्या क्षमतेबाबत गुवाहाटीतील रहिवाशांनी सर्वाधिक मेंटल वेलबीइंग (84%) दाखवून दिले आहे. यानंतर, दिल्ली-एनसीआरने (78%) सर्वोत्तम मेंटल वेलबीइंग स्कोअर नोंदवून दुसरा क्रमांक पटकावला. नागरिकांच्या मेंटल वेलबीइंगची ‘चांगली’ क्षमता दर्शवणाऱ्या शहरांमध्ये इंदोर (75%), कोइम्बतूर (73%) व पुणे (72%) यांचा समावेश आहे. मुंबईने सर्वात कमी, म्हणजे केवळ 28% मेंटल वेलबीइंग इंडेक्स दर्शवला आणि नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाचा ताण व चिंता अधोरेखित केल्या. यानंतर लखनऊचा, 36%, क्रमांक लागला.
टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी मेंटल वेलबीइंग ही संकल्पना स्पष्ट करताना सांगितले, “या सर्वेक्षणाच्या बाबतीत मेंटल वेलबीइंग म्हणजे सध्याच्या संकटाशी संबंधित असलेल्या चिंता हाताळण्याची क्षमता. चिंतांचा सामना करण्याची क्षमता व्यक्तीच्या मानसिकतेवर आधारित आहे, शिवाय शहरात रुग्णांच्या संख्येत किती वाढ झाली आहे यावरही अवलंबून आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक कोविड-19 रुग्ण आढळले असून या विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्यानेही या आजाराचा सामना करण्याच्या बाबतीत लोकांच्या मेंटल वेलबीइंगवर परिणाम झालेला असू शकतो.” कोपिंग इंडेक्सचा वापर न्युमरेटर म्हणून करून आणि वरी इंडेक्सचा वापर डिनॉमिनेटर म्हणून करून मेंटल वेलबीइंग इंडेक्स ठरवण्यात आला आहे. चार निकषांच्या आधारे टक्केवारीमध्ये मोजणी केली जाते आणि वरी इंडेक्सची सहा निकषांच्या आधारे टक्केवारीमध्ये मोजणी केली जाते.
ग्लोबल हॉस्पिटल व हिंदूजा खार येथे प्रॅक्टिस करणाऱ्या कन्सल्टंट सायकिअॅट्रिस्ट डॉ. जल्पा बुट्टा यांनी सांगितले, “सामना करण्याची कौशल्ये ही एखाद्याची लवचिकता, दृष्टिकोन, विचारसरणी व पाठिंबा यावर अवलंबून असते. लहान शहरांतील अनेक लोक उत्तम मेंटल वेलबीइंगमुळे परिस्थितीचा सामना चांगल्या प्रकारे करत आहेत, हे यातून अधोरेखित झाले आहे. मोठ्या शहरांमध्ये कामाच्या स्थिरतेची चिंता, असे अनेक घटक जबाबदार असू शकतात. आपले करिअर व अर्थार्जनाची क्षमता यानुसार आपली ओळख ठरत असेल तर सध्याच्या परिस्थितीचा परिणाम झाल्यामुळे लोकांना खचल्यासारखे वाटू शकते. मोठ्या शहरांमध्ये नातेसंबंधही नाजूक बनत आहेत, एकमेकाला फारसा पाठिंबा देत नाहीत; खरे तर मेंटल वेलबीइंगसाठी हा पाठिंबा फार गरजेचा आहे.”
चंद्रमौली यांनी शहरा-शहरांतील बदल स्पष्ट करत म्हटले, “मोठ्या शहरांच्या तुलनेत लहान शहरांचा मेंटल वेलबीइंग इंडेक्स तुलनेने उच्च आहे आणि मुंबई, चेन्नई व कोलकाता यांच्या तुलनेत गुवाहाटी, जयपूर, इंदोर, पुणे, कोइम्बतूर ही शहरे परिस्थितीशी चांगल्या प्रकारे सामना करत आहेत.”
परिस्थिती हाताळण्यासाठी डॉ. भुट्टा यांनी वागण्यातील बदल सुचवले. त्या म्हणाल्या, “आपण सर्वांनी आपल्या स्वतःमध्येच शांततेचा शोध घेणे, अध्यात्मिक व स्वीकारार्हता वाढवणारा दृष्टिकोन जोपासणे, बदल हाताळणे शिकणे आणि आव्हानात्मक कालावधीमध्ये अधिक ताकद आजमावणे आवश्यक आहे.”