जागतिक मेडिकल खरेदीदारांसाठी नवे व्यवसाय, संधी होणार उपलब्ध ~
मुंबई, १ जून २०२१: ट्रेडइंडिया या देशातील आघाडीच्या बी२बी ऑनलाइन मार्केटप्लेस प्लॅटफॉर्मने मेडिकल अँड हेल्थकेअर एक्सपो इंडिया 2021 या नवव्या भव्य व्हर्चुअल इव्हेंटच्या आयोजनाची तयारी केली आहे. १० ते १२ जूनपर्यंत होणाऱ्या या मेडिकल प्रदर्शनात मेडिकल व आरोग्य सेवा उत्पादन, हॉस्पिटल व मेडिकल पुरवठादार, फार्मास्युटिकल्स ड्रग्ज अँड मेडिसिन्स तसेच इतर आरोग्य व सौंदर्य उत्पादनांमधील भारतीय निर्माते, पुरवठादार आणि निर्यातदार यांना नव्या बिझनेस भागीदारीची संधी शोधण्याकरिता तसेच आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवण्याकरिता मदत केली जाईल.
ट्रेडइंडिया डॉटकॉमचे सीईओ श्री संदीप छेत्री म्हणाले, ‘महामारीच्या या निराशाजनक काळात देशातील आरोग्यसेवा क्षेत्रासाठी व्हर्चुअल मेडिकल एक्सपोचे आयोजन करणे हे ट्रेडइंडियाचे सामाजिक कर्तव्य असून आम्ही ते पार पाडत आहोत. महामारीदरम्यान, असंख्य उत्पादक आणि पुरवठादारांना अत्यावश्यक मेडिकल साधने आणि प्रणाली पुरवण्यासाठी देशातील आरोग्य सेवा मजबूत होईल. एवढेच नाही तर, या प्राणघातक विषाणूविरुद्ध लढा देणाऱ्या देशातील लोकांना आणखी संधी मिळेल.’
अथक प्रयत्नांतून महामारीशी लढा देण्याच्या उद्देशाने ट्रेडइंडिया भारतीय मेडिकल पुरवठादार आणि उत्पादकांना जागतिक आणि खऱ्या खरेदीदारांशी डिजिटली कनेक्ट होण्यास, व्हिजिटर्सना उत्पादने आणि सेवांचे प्रदर्शन करण्यास, बिझनेस पार्टनरशिप आणि चॅनल्स तयार करण्यास मदत करेल. तसेच पात्र नेतृत्व निर्माण करणे, वितरक नियुक्त करणे तसेच भारतातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या व्हर्चुअल मेडिकल अँड हेल्थकेअर एक्सपोमध्ये प्रदर्शन करण्याची संधी यातून मिळेल.