मुंबई: अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहातील महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) आर्थिक वर्ष १८ मध्ये ३ लाखांहून अधिक युनिटची विक्री करून ट्रॅक्टर उद्योगामधील आघाडीचे स्थान कायम राखले आहे. यामुळे कंपनीने आर्थिक वर्ष १८ मध्ये आजपर्यंतची सर्वाधिक वार्षिक ट्रॅक्टर विक्री केली आहे व देशांतर्गत बाजारात२२ % वाढ नोंदवली आहे.संख्येच्या बाबतीत सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी असलेल्या महिंद्राने आर्थिक वर्ष १८ मध्ये देशांतर्गत बाजारात३०४०१९ युनिटची विक्री केली आणि आर्थिक वर्ष १८ मध्ये एकूण ३१९,४६८ युनिटची (देशांतर्गत + निर्यात) विक्री करून, अनुक्रमे २२ % व२१ % वाढ साध्य केली. सध्या, भारतीय ट्रॅक्टर उद्योगात महिंद्राचा हिस्सा ४२.९ 9% आहे आणि गेली ३५ वर्षे आघाडीचे स्थान कायम राखले आहे.या उद्योगाविषयी बोलताना,महिंद्रा समूहातील महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष राजेश जेजुरीकर यांनी सांगितले, “तंत्रज्ञानावर आधारित असलेली आमची उत्पादने शेतकऱ्यांच्या गरजांविषयी आमच्या सखोल आकलनावर व उत्पादने प्रभावी ठरावीत या विचारावर बेतलेली आहेत. स्थापना झाल्यापासून, आम्ही तंत्रज्ञान-प्रणित नावीन्य व गुणवत्ता-प्रणित उत्कृष्टता यामार्फत फार्म टेक प्रॉस्परिटी साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या माध्यमांची क्षमता व सर्वंकष उत्पादने यांची सांगड घालून आम्ही एका वर्षात आजवरची सर्विक विक्री नोंदवली आहे. ट्रॅक्टरची विक्री करण्याच्या पलीकडे विचार करून, शेतीच्या दृष्टीने निरनिराळ्या सुविधा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”