
मुंबई, ९ ऑक्टोबर २०२५: २०२४ लीडर एडिशनच्या प्रचंड यशानंतर, टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) आता २०२५ फॉर्च्युनर लीडर एडिशनच्या लाँचसह अधिक दमदार छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. सुधारित स्टायलिंग आणि प्रीमियम अपग्रेड्ससह सुसज्ज ही नवी आवृत्ती फॉर्च्युनरच्या रस्त्यावरील प्रभावी उपस्थितीला आणखी अधोरेखित करते आणि ग्राहकांना अधिक स्पोर्टी व गतिशील अनुभव देते.
नवीन फॉर्च्युनर लीडर एडिशन अद्वितीय कार्यक्षमतेसह आधुनिक आणि दमदार स्टायलिंगचा संगम साधत, एसयूव्हीप्रेमींच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आली आहे. फॉर्च्युनरच्या गौरवशाली परंपरेला पुढे नेत, लीडर एडिशन सर्वोच्च कार्यक्षमता, विश्वासार्ह ऑफ-रोड क्षमता आणि २.८ लिटर डिझेल इंजिनच्या शक्तीसह अपवादात्मक ड्रायव्हिंग आराम देते. २०२५ फॉर्च्युनर लीडर एडिशन ४x२ ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असून, अॅटिट्यूड ब्लॅक, सुपर व्हाइट, पर्ल व्हाइट आणि सिल्व्हर या आकर्षक रंगांमध्ये सादर करण्यात आली आहे. या विशेष आवृत्तीची बुकिंग ऑक्टोबर २०२५ च्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होणार आहे.
या लाँचबाबत आपले मत व्यक्त करताना टोयोटा किर्लोस्कर मोटरचे सेल्स, सर्विस आणि युज्ड कार बिझनेसचे उपाध्यक्ष श्री. वरिंदर वाधवा म्हणाले, “टोयोटामध्ये आम्हाला आमच्या ग्राहकांच्या सर्वसमावेशक जीवनशैली आणि त्यांच्या बदलत्या प्राधान्यक्रमांमधून सतत प्रेरणा मिळते, ज्यामुळे आम्ही आमच्या ऑफरिंग्स अधिक नाविन्यपूर्ण आणि उत्साहवर्धक बनवत राहतो. २०२४ फॉर्च्युनर लीडर एडिशनला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादाबद्दल आणि भारतीय रस्त्यांवरील तिच्या आयकॉनिक स्थानाबद्दल आम्ही मनःपूर्वक आभारी आहोत. हाच विश्वास आणि प्रोत्साहन आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले असून, आम्हाला २०२५ फॉर्च्युनर लीडर एडिशन सादर करण्याचा अत्यंत आनंद होत आहे. ही आवृत्ती अधिक स्पोर्टी आणि गतिशील एसयूव्हीचा अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी खास डिझाइन करण्यात आली आहे. आम्हाला विश्वास आहे की ही नवीन एडिशन ग्राहकांना अधिक आनंदित करेल आणि प्रीमियम एसयूव्ही श्रेणीमध्ये मापदंड म्हणून फॉर्च्युनरचा दर्जा अधिक दृढ करेल.”
अनेक नवीन स्टायलिंग घटक जसे नवीन ग्रिल डिझाइनसह फ्रण्ट व रिअर बम्पर स्पॉयलसट आणि क्रोम गार्निश २०२५ फॉर्च्युनर लीडर एडिशनच्या आयकॉनिक दर्जामध्ये अधिक भर करतात. काळ्या रंगामधील ड्युअल-टोन रूफ वेईकलच्या प्रीमियममध्ये अधिक आकर्षकतेची भर करते आणि वेईकलची साहसी विशिष्टता वाढवते. काळ्या रंगामधील चकाकणरे अलॉई व्हील्स आणि विशिष्ट हूड एम्ब्लेम प्रत्येक प्रवासादरम्यान लक्षवेधक उपस्थितीची खात्री देतात.
नवीन फॉर्च्युनर लीडर एडिशनच्या इंटीरिअरमधून वेईकलचा सुधारित स्पोर्टीनेस त्वरित दिसून येतो. ब्लॅक व मरून रंगामधील ड्युअल-टोन सीट्स आणि डोअर ट्रिम्समधून आकर्षकता दिसून येते, तसेच ऑटो-फोल्ड होणारे मिरर्स, प्रकाशित स्कफ प्लेट्स स्टाइल व सोयीसुविधा वाढवतात. प्रगत वैशिष्ट्ये जसे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (टीपीएमएस) वेईकलच्या एकूण सुरक्षितता पॅकेजला अधिक मजबूत करते. प्रत्येक घटक ड्रायव्हिंग अनुभव उत्साहित करण्यासाठी, तसेच फॉर्च्युनरचा आरामदायीपणा व विश्वसनीयतेचा हॉलमार्क कायम ठेवण्यासाठी बारकाईने डिझाइन करण्यात आले आहेत.
२०२५ फॉर्च्युनर लीडर एडिशनची खासियत म्हणजे टोयोटाचे प्रमाणित १जीडी-एफटीव्ही २.८-लिटर टर्बोचार्ज इंजिन, जे उच्च दर्जाची कामगिरी व कार्यक्षमतेसाठी व्हेरिएबल जिओमेट्री टर्बोचार्जरसह सुसज्ज आहे. प्रभावी २०१ बीएचपी शक्ती आणि ५००* एनएम टॉर्क देत इंजिनसोबत ६-स्पीड मॅन्युअल किंवा ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, ज्यामधून सहजपणे पॉवर डिलिव्हरी आणि ड्रायव्हिंगदरम्यान अधिक आरामदायीपणाची खात्री मिळते. रिअर-व्हील ड्राइव्ह (आरडब्ल्यूडी) ४x२ कॉन्फिग्युरेशनसह नवीन फॉर्च्युनर लीडर एडिशनमध्ये लक्षवेधक कार्यक्षमता आणि दैनंदिन ड्रायव्हिंग क्षमतेचे उत्तम संतुलन आहे, ज्यामुळे ही वेईकल विविध रस्त्यांसाठी वैविध्यपूर्ण सोबती आहे.
ग्राहकांना परिपूर्ण समाधान देण्याासठी फॉर्च्युनर लीडर एडिशन व्हेरिएण्ट्सना सर्वोत्तम फायनान्स सोल्यूशन्सच्या श्रेणीचे पाठबळ आहे, ज्यामध्ये जवळपास ८ वर्षांच्या फंडिग प्लॅन्ससह कमी ईएमआय, टोयोटा स्मार्ट बलून फायनान्स आणि विस्तारित वॉरंटी व टोयोटा जेन्यूएन अॅक्सेसरीज अशा मूल्यवर्धित सेवांसाठी पूर्व-मान्य केलेल्या पर्यायांचा समावेश आहे. याला पूरक पाच वर्षांचे कॉम्प्लीमेण्टरी रोडसाइड असिस्टण्स, जवळपास ५ वर्षे / २२०,००० किमीपर्यंत विस्तार करता येणारी प्रमाणित ३-वर्ष / १००,००० किमी वॉरंटी आणि कस्टमायझेबल टोयोटा स्माइल्स प्लस सर्विस पॅकेज आहे, ज्यासह विनासायास आणि चिंता-मुक्त मालकीहक्क अनुभवाची खात्री मिळते.
१५ वर्षांपूर्वी पदार्पण केल्यापासून फॉर्च्युनरने भारतातील सर्वात लोकप्रिय व विश्वसनीय एसयूव्ही म्हणून आपला दर्जा स्थापित केला आहे. बुलेटप्रूफ विश्वसनीयता, रस्त्यावर लक्षवेधक उपस्थिती, कालातीत एसयूव्ही डिझाइन आणि अस्सल ४x४ क्षमतेसाठी लोकप्रिय असलेली फॉर्च्युनर मापदंड स्थापित करत आहे, जी तिच्या श्रेणीमध्ये अद्वितीय आहे. या वेईकलच्या ३,००,००० हून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे.














