रत्नागिरी, 24 June : जिल्ह्यात 1 जून पासून आज (24 जून 2020) पर्यंत 777.56 च्या सरासरीने एकूण 6998 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात सरासरी 5.78 मिमी तर एकूण 52 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी पहिल्या 24 दिवसांमध्ये 277.33 मिमी च्या सरासरीने 2494 मिमी पाऊस झाला. यंदा हे प्रमाण तीन पटीने अधिक आहे. वार्षिक सरासरीच्या 23 टक्के पाऊस या 24 दिवसात पडला आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड निरंक मिमी, दापोली 6.00 मिमी, खेड 9 मिमी, गुहागर 5 मिमी, चिपळूण 3 मिमी, संगमेश्वर 4 मिमी, रत्नागिरी 5 मिमी, राजापूर 4 मिमी, लांजा 16 पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या सकाळी 10 वाजेपर्यंतच्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
खेड तालुक्यातील मौजे लोटे येथील सुरज दिलीप पाटील वय 28 यांनी 22 जून 2020 रोजी आंबंडस येथील बंधाऱ्यामध्ये उडी मारली असून सदर व्यक्तीचा शोध लागला नाही शोध कार्य सुरु आहे.
गुहागर तालुक्यातील मौजे रानवी येथील मुरलीधर धाकू बारगोडे यांच्या म्हैशीला विजेच्या तारेचा शॉक लागून मृत्यू झाला असून 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.