अण्णा दुरांतो(प्रशांत गायकवाड)
नुकताच तेजाब सिनेमा पूर्णपणे उतरला. अडीच वर्षे मोहनीला ओलीस ठेवल्यानंतर मुन्नाने त्याच्या मित्रांसह मोहिनीला सोडवले आणि तिचा सन्मान केला. मोहनीला पळवून नेताना लोटीया पठाणने केवळ बघ्याची भूमिका घेतली आणि ओलीस ठेवलेल्या अनेक मोहनी मुन्नाच्या मित्रांसह पळाल्या. त्यांच्या बसने सीमा ओलांडली. सोबतीला बबन होताच. मोहनी-मुन्नाला जुन्या आठवणी आठवल्या. गाणे होते-‘सो गया ये जहा…सो गया आसमा…।। बस निश्चित स्थळी पोहोचली. आता पुढे काय करायचे. ऑर्केस्ट्रावाल्या सक्सेनाची भीती होती. तीही फोल ठरली. इथे मात्र सक्सेना मोहनीच्या मैत्रिणी परत येतील, या आशेवर बसलेला. मग सर्वजण कंजूष शेठच्या हॉटेलमध्ये राहिले. बबनने नेहमीप्रमाणे शेठला येडा बनवला. बरेच दिवस गेले. मोहनीसह मैत्रिणींना मुंबईची ओढ लागू लागली. त्या रडू लागल्या. मुन्नाला पाहवले नाही. मग सर्व गोव्याला येतात. कसिनो खेळतात. मुन्ना आणि बबन वेशांतर करून मुंबईतल्या पठाणच्या अड्ड्यावर येतात. अड्डा उद्धवस्त करायचा असतो. यावेळी इन्स्पेक्टर गगन सिंगही सोबत असतो. सिंगला मुन्ना सगळी स्टोरी सांगतो. अगदी मुकुट बिहारी…गरब्याला केलेला लफडा…वैगेरे.. वैगेरे. मुन्नाला मुंबई अखेरीस सेफ वाटते. तो गोव्यात फोन करून कळवतो. गाणे सुरू होते…तुमको हम दिलबर क्यो माने..।
पठाण, सक्सेना मोहिनी आणि मैत्रिणी पुन्हा येतील याच आशेवर कायम राहतात. इथे मुन्ना ‘गुलदस्त्या’ला मोहिमेवर धाडतो. आता तर इन्स्पेक्टर चौहानही त्याला मिळालेला असतो. सर्वजण शामलालचे घर काबीज करतात. मुन्ना गोव्याला कॉल करतो. त्याचे मित्र टेबलवर चढून नाचू लागतात. मोहिनीला मुंबईत आणले जाते आणि गाणे सुरू होते….मित्र ओरडतात मोहनी मोहनी मोहनी हो हो हो…..
नमस्कार! नमस्कार!
कहिये, क्या सुनेंगे आप?
अरे पहले ये कहिये, कहाँ थीं आप?
मैं … मैं कर रही थी किसी का इन्तज़ार
कौन है वो?
जिसे करती हूँ प्यार
है …
और, जिससे करती हूँ मिन्नतें बार बार
कैसे?
ऐसे …
Ding Dong Ding, Ding Dong Ding Dong Ding Dong,
Ding Dong Dong, Ding Dong
(एक दो तीन, चार पाँच छै सात आठ नौ, दस ग्यारह बारह तेरह) \- २,
आणि…पुढे काय घडते..आपल्याला माहीत आहेच.
आणि मुन्ना जॉनी लिव्हर सोबत पैज जिंकलेला असतो.. बंबई हो या नासिक..।
कहदो के तुम हो मेरी वरना…