ठाणे, विशेष प्रतिनिधी:- दिवा भागात दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोक संख्येबरोबरच, सोयी- सुविधांचा अभाव आदी विविध समस्या भेडसावत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मनोज कोकणे हे त्या सोडविण्यास सक्षम आहेत, असा दृढ विश्वास ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्षा डॉ. राणी देसाई यांनी व्यक्त केला. तसेच मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास फक्त आवाज द्या, तात्काळ हजर होईन, असे सांगत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. दिवा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य जनसंपर्क कार्यालयाला नुकतीच भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या. डाॅ. देसाई यांच्यासोबत पती डाॅ.जयंत देसाई, स्मिताताई भोसले, अस्पाक मोलानी, जितेंद्र भाटी हे देखील उपस्थित होते.
दरम्यान, दिवा भागातील राष्ट्रवादीचे नेते आणि ठाणे जिल्हा चिटणीस मनोज कोकणे यांनी दिव्यातील मूलभूत समस्यांचा पाढा वाचला. तसेच महिला कार्यकर्त्यांना सक्षम आणि बळकट करणार असल्याचे म्हटले. यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उभारणार-
दिव्यात महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अत्यावश्यक असलेली सार्वजनिक शौचालय व्यवस्था देखील उपलब्ध नसल्याची बाब दिवा युवती महिला कार्यकर्त्या पूजा मोहिते, कविता पाटील, शीतल लाड यांनी डॉ. देसाई यांच्या निदर्शनास आणून दिली. राष्ट्रवादीच्या माध्यमातून लवकरच ही कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना डॉ. देसाई कार्यकर्त्यांना दिल्या.
सत्कार समारंभ
डॉ. राणी देसाई यांचे महिला कार्यकर्त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ स्वागत केले. तर दिवा शहर ब्लॉक अध्यक्ष निलेश कापडणे डाॅ.जयंत देसाई यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिवा शहर ब्लॉक क्रमांक २७ चे अध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी केले. संजय काथेपुरी, श्रीकांत जाधव, शितल लाड, कविता काळे-पाटील यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. दिवा शहर ब्लॉक क्र.28 अध्यक्ष विजय वाघ यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे आभार मानत व कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहिर केले.