रत्नागिरी : तिवरे धरण दुर्घटनेत बेपत्ता असलेल्यांपैकी आज आणखी एक मृतदेह सापडला. आतापर्यंत एकूण 20 मृतदेह सापडले आहेत. अजूनही 2 जण बेपत्ता आहेत.
तिवरे धरण दुर्घटनेत बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरूच आहे. मंगळवारी 2 जुलै रोजी ही दुर्घटना घडली. एनडीआरएफच्या शोधकार्याचा आजचा सहावा दिवस आहे. गेले दोन दिवस एकही मृतदेह सापडला नव्हता. मात्र शोधकार्याच्या सहाव्या दिवशी आज आणखी एक मृतदेह सापडला.. मात्र अजूनही दोन जण बेपत्ता असून त्यामध्ये दीड वर्षांच्या दुर्वा रणजीत चव्हाण हिचाही समावेश आहे.