रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे -कुंभारवाडीतील श्री गुरुदेव दत्त विठ्ठल रखुमाई मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा भक्तिमय वातावरणात नुकताच संपन्न झाला. यावेळी समाज बांधवांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.
निसर्ग संपन्न सह्याद्रीच्या कुशीत तिवरे गाव वसलेलं आहे. अशा या निसर्ग संपन्न परिसरातील कुंभारवाडीमध्ये श्री गुरुदेव दत्त विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा भक्तिमय वातावरणात शेकडो ग्रामस्थांच्या आणि समाजबांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रमाला कुंभार समाजाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर, चिपळूण तालुकाध्यक्ष प्रकाश साळवी, संत गोरा कुंभार नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुनिल उर्फ नाना टेरवकर, पतसंस्था संचालक तुकारामबाबा साळवी, बबन पडवेकर, तुकाराम साळवी, खजिनदार जनार्दन मालवणकर, तिवरे सरपंच गजानन साळवी, मंडळाचे अध्यक्ष शांताराम शिरकर, जेष्ठ नेते सुरेशदादा साळवी व सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष रविंद्र शिरकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.