नवी दिल्ली : बंगालच्या उपसागराच्या पश्चिम-मध्य भागात तीव्रतेचे रूप धारण केल्यांनतर ‘तितली’ चक्रीवादळ सुमारे ताशी 14 किलोमीटर वेगाने उत्तरेकडे सरकले आहे . बंगालच्या उपसागरातील पश्चिम-मध्य दिशेकडे गोपालपूर (ओडिशा) पासून सुमारे 320 किलोमीटर दूर दक्षिण-दक्षिण पूर्वेकडे आणि कलिंगपटनम (आंध्र प्रदेश) पासून 270 किलोमीटर दूर दक्षिण-पूर्व भागात त्याचे केंद्र आहे. पुढील दोन तासात याची तीव्रता आणखी वाढेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
‘तितली’ चक्रीवादळ उत्तर-उत्तर पश्चिमेकडे सरकण्याची आणि 11 ऑक्टोबरला सकाळी गोपालपुर आणि कलिंगपतनम मधील ओडिशा आणि आसपासच्या आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील किनारपट्टी पार करण्याची शक्यता आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ पुन्हा उत्तर-पूर्वेकडे धडकण्याची शक्यता असून नांतर त्याची तीव्रता कमी होईल.
आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील तर ओडिशाच्या दक्षिणेकडील जिल्ह्याना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काल संध्याकाळी तातडीची आढावा बैठक घेतला. उच्च स्तरावर परिस्थितीवर देखरेख ठेवली जात आहे.