‘ताने पलट दे‘ मोहिमेच्या माध्यमातून खेळामधील सर्वसमावेशकता, विविधतेला पाठिंबा
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक्स २०२० मध्ये #PalatDe मोहिमेसह ख-या शौर्याला प्रशंसित केल्यानंतर दि कोका-कोला कंपनीचा स्वदेशी ब्रॅण्ड थम्स अप आता टोकियो २०२० पॅरालिम्पिक गेम्ससह सहयोग करणारा पहिला एफएमसीजी ब्रॅण्ड ठरला आहे. या सहयोगाच्या माध्यमातून थम्स अपचा सर्वसमावेशकतेला प्रोत्साहित करण्याचा आणि आव्हाने असताना देखील आपल्या मर्यादांवर मात करणा-या व या प्रतिष्ठित जागतिक क्रीडा महोत्सवामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या टोकियो २०२०च्या ख-या हिरोंना सलाम करण्याचा मनसुबा आहे. टोकियो २०२० पॅरालिम्पिक गेम्सचे आयोजन टोकियोमध्ये २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत करण्यात आले आहे.
दि कोका-कोला कंपनीचा जगभरातील प्रमुख क्रीडा महोत्सवांचे प्रायोजक असण्याचा दीर्घकालीन इतिहास आहे. आठ-दशकांच्या सहयोगासह ही कंपनी ऑलिम्पिक गेम्सची दीर्घकाळापासून कॉर्पोरेट सहयोगी राहिली आहे. यंदाचे वर्ष ब्रॅण्डच्या पॅरालिम्पिक गेम्ससोबतच्या सहयोगाच्या शुभारंभाला सादर करते. क्रीडा महोत्सवांसोबतच्या या सहयोगांमधून ब्रॅण्डचे त्यांच्या ग्राहकांचे आनंदी क्षण व प्रसंगांचे भाग असण्याचे प्रयत्नशील तत्त्व दिसून येते.
या सहयोगाची घोषणा करत भारत व आग्नेय आशियामधील कोका-कोलाच्या विपणन विभागाचे उपाध्यक्ष व प्रमुख अर्णब रॉय म्हणाले, ”आम्हाला टोकियो २०२० पॅरालिम्पिक गेम्स आणि पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियासोबतच्या या धोरणात्मक सहयोगाचा अत्यंत अभिमान वाटतो. एकतेला पाठिंबा देण्याची आणि जीवनाच्या विभिन्न स्तरामधून असले तरी सर्व विषमता व आव्हानांवर मात करत शौर्य दाखवलेल्या या अॅथलीट्सचे धैर्य व दृढनिश्चयाला सलाम करण्याची आमची ही अनोखी पद्धत आहे. ऑलिम्पिक असोसिएशनचे विस्तारीकरण म्हणून आम्ही आव्हानांशी लढणा-या आणि या जागतिक क्रीडा महोत्सवामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा-या या पॅरालिम्पियन्सना इतर अॅथलीटप्रमाणेच प्राधान्य देतो.”
या सहयोगाबाबत बोलताना पद्मश्री खेलरत्न अर्जुन पुरस्कार-प्राप्त, पॅरालिम्पिक गेम्समध्ये पदक जिंकणा-या पहिल्या भारतीय महिला आणि पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्ष डॉ. (एच.सी.) दीपा मलिक म्हणाल्या, ”विकलांगत्वाच्या पलीकडे असलेल्या क्षमतेच्या माझ्या प्रवासाने विकलांगत्वाबाबतची समज मोडून काढली आहे. थम्स अपसोबतचा सहयोग त्या दिशेने एक पाऊल पुढे आहे. यावर्षी, भारत टोकियो २०२० पॅरालिम्पिक गेम्ससाठी आतापर्यंतच्या सर्वोत्तम खेळाडूंची सर्वात मोठी तुकडी पाठवत आहे आणि सर्व ५४ खेळाडूंची विषमता व सामाजिक निषिद्धांवर मात करत पुढे जाण्याची स्थिर कथा आहे. मला खूप आशा आहे की, आपण यावेळी इतिहास रचणार आहोत. थम्स अपसारखे ब्रँड आमच्या पॅरालिम्पियन्सना त्यांच्या कथा सांगण्यास व्यासपीठ देण्यासाठी आणि देशाला त्यांचा प्रवास साजरा करण्याची व त्यांचा उत्साह उंचावण्याची संधी देण्यासाठी पुढे येत आहेत. थम्स अप आमच्या खेळाडूंसोबत या सहयोगाच्या माध्यमातून, तसेच त्यांना ऑलिम्पियन्स म्हणून प्राधान्य देत विविधता व सर्वसमावेशकतेची मूल्ये बिंबवण्यास पुढाकार घेत आहे.”
क्रीडापटूंच्या कठीण प्रवासाला मानवंदना आणि त्यांच्या सर्वोत्तम खेळाला सलाम करत थम्स अप एका उच्चस्तरीय मोहिमेचे अनावरण करणार आहे. टोकियो २०२० पॅरालिम्पिक गेम्स आणि भारतीय क्रीडापटूंशी प्रेक्षकांना जोडण्यासाठी या मोहिमेत डिजिटल व सोशल मीडियाकरिता व्हिडिओ आणि इतर संबंधित व्हिज्युअल्सचा समावेश आहे. या मोहिमेत मरिअप्पन थंगावेलू (हाय जंप), सकीना खातून (पॉवरलिफ्टिंग), सुयश यादव (स्विमिंग), नवदीप (भाला फेक), सुमित अंतील (भाला फेक) आणि अवनी लेखरा (नेमबाजी) या ६ खेळाडूंचा समावेश आहे. व्हिडिओ मोहिम प्रभावीपणे या खेळाडूंचे अविरत धैर्य आणि आव्हानांना तोंड देण्याची त्यांची शक्ती प्रकाशझोतात आणते. दैनंदिन आव्हानांशी सामना करणारे हे नायक प्रेरणादायी टॅगलाइन #TaanePalatDe पार्श्वभूमीसंदर्भात त्यांना लोकांकडून दररोज मिळणारे ‘टोमणे’ असलेले त्यांचे टी-शर्टस् परिधान केलेल्या रूपामध्ये दिसत आहेत. जाहिरातीची प्रेरणादायी टोन थम्स अप ब्रॅण्डच्या ‘वास्तविक शौर्य’ या संदेशाशी पूरक आहे.
ओगील्व्ही इंडियाचे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर सुकेश नायक म्हणाले, ”#TaanePalatDe मोहिम सर्व विषमतेवर मात करत जपानमधील टोकियो २०२० पॅरालिम्पिक गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा-या टीम इंडियामधील हिरोंना एक मानवंदना आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही त्यांना नेहमीच ताना देणा-या नकारात्मक व्यक्तींच्या मतांना #PalatDe करण्यासाठी त्यांच्या शौर्यांना सलाम करत आहोत.
ही टीव्हीसी येथे पाहता येऊ शकते:















