बेंगळुरू, 18 ऑगस्ट २०२१: थ्री व्हील्स युनायटेड (टीडब्ल्यूयू) या हलक्या वजनाच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बेंगळुरूस्थित टेक-एनेबल्ड वित्तपुरवठादार कंपनीने भारतात इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांच्या स्वीकृतीला वेग देण्यासाठी पियाजिओ व्हेइकल्ससोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीअंतर्गत, थ्री व्हील्स युनायटेड त्वरित ५०० पिअॅजिओ आपे ई सिटी आणि आपे ई-एक्स्ट्रा वाहने भारतभरात रस्त्यांवर आणणार आहे.
पियाजिओच्या आपे ई सिटी आणि आपे ई-एक्स्ट्रा या वाहनांच्या स्वीकृतीला बढावा देण्यासाठी थ्री व्हील्स युनायटेड आणि पियाजिओ एकत्रितपणे काम करणार आहेत. थ्री व्हील्स युनायटेड तीनचाकी प्रवासी वाहनांच्या व मालवाहू वाहनांच्या चालकांना कार्बन उत्सर्जन करणाऱ्या जुन्या वाहनांऐवजी जवळपास शून्य कार्बन उत्सर्जन करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांकडे वळण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करणार आहे. याशिवाय, टीडब्ल्यूयू या चालकांना अॅग्रीगेटर प्लॅटफॉर्म्सशीही जोडून देईल. या वाहनांच्या देखभालीसाठी तसेच सर्व्हिसिंगसाठी लागणारी सर्व मदत पियाजिओ करणार आहे. यामुळे ऑपरेशन्समधील डाउनटाइम कमीत-कमी राहील. या भागीदारीमुळे ऑटोरिक्षा चालकांना जुन्या प्रदूषणकारक वाहनांकडून इलेक्ट्रिक वाहनांकडे स्थित्यंतर करण्यास आवश्यक ते सर्व सहाय्य तर मिळेलच शिवाय त्यांना ही वाहने विनाकटकट चालवण्यासाठी आवश्यक ती मदत टीडब्ल्यूयू व पियाजिओ यांच्याकडून मिळेल व त्यामुळे त्यांचे उत्पन्नही वाढेल.
थ्री व्हील्ड युनायटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक केड्रिक टँडाँग या भागीदारीबद्दल म्हणाले, “ऑटोरिक्षा चालकांना अखेरच्या टप्प्यापर्यंतच्या शाश्वत वाहतुकीकडे वळणे अधिक सोपे व्हावे म्हणून आम्ही मोठ्या इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांशी भागीदारींचा विस्तार सातत्याने करत आहोत. आपे ई-सिटी आणि आपे ई-एक्स्ट्रा यांच्या स्वीकृतीला चालना देण्यासाठी पियाजिओशी सहयोग केल्यामुळे मी खूपच आनंदित झालो आहे. आमच्या सहाय्याच्या माध्यमातून, चालक या किफायतशीर, मोठा नफा कमावून देणाऱ्या तसेच प्रदूषण कमी करणाऱ्या वाहनांकडे सहज वळू शकतील.”
पियाजिओ प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी या भागीदारीबद्दल म्हणाले, “पियाजिओ आपल्या दुर्गम भागातील चाकोरीबाह्य वाहतूक उत्पादनांसाठी ओळखली जाते. आमचे नुकतेच लाँच झालेले प्रवासी वाहन आपे ई सिटी आणि कार्गो व्हराएंट आपे ई-एक्स्ट्रा यांना ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. थ्री व्हील्स युनायटेडशी झालेल्या भागीदारीच्या माध्यमातून आम्ही अगदी दुर्गम भागापर्यंत पर्यावरणपूरक वाहतुकीचा प्रसार करण्याच्या दिशेने चाललेले आमचे प्रयत्न अधिक वाढवणार आहोत.”
आपे ई-सिटी हे वाहन क्रांतीकारी ड्रायव्हिंगचा अनुभव देते. या वाहनाचे कार्बन उत्सर्जन शून्य आहे आणि आवाज व कंपनेही जवळपास नाहीत. त्यामुळेच भारताच्या शहरी भागातील शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचणारे अत्याधुनिक वाहन ठरले आहे. या वाहनामध्ये विभागातील सर्वोत्तम अशा अनेकविध सुविधा आहेत. ली-आयन बॅटऱ्या, स्वयंचलित गीअरबॉक्स, श्रेष्ठ पॉवर व टॉर्क, गीअर व क्लचविरहित प्रणाली, सुरक्षिततेसाठी दारे, पूर्णपणे डिजिटल क्लस्टर अशा अनेक सुविधांनी हे वाहन सुसज्ज आहे.
नवीन आपे ई-एक्स्ट्रा एफएक्स हे या विभागातील सर्वांत शक्तिशाली इलेक्ट्रिक कार्गो वाहन (मालवाहतुकीचे) आहे. त्याची ऊर्जा निष्पत्ती (पॉवर आउटपुट) ९.५ किलोवॅट आहे. या वाहनाचे संपूर्ण स्थापत्य धातूच्या बॉडीमध्ये घडवलेले आहे आणि त्यात उपयुक्त असा ६ फूट लांबीचा कार्गो डेक बसवलेला आहे. हे वाहन डिलिव्हरी व्हॅन, कचरा संकलक गाड्या यांसारख्या वेगवेगळ्या उपयोजनांसाठी कस्टमाइझ केले जाते.
दोन्ही उत्पादनांमध्ये या श्रेणीतील सर्वोत्तम म्हणावी अशी अनेक फीचर्स आहेत. ब्ल्यू व्हिजन हेडलॅम्प्स, स्वयंचलित ट्रान्समिशन, हिल होल्ड असिस्ट, रिजनरेटिव ब्रेकिंग, ड्युअल-टोन सीट्स, स्ट्रायकिंग बॉडी कलर्स व ग्राफिक्स, मल्टि-इन्फर्मेशन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, बूस्ट मोड आदी फीचर्सने वाहने सुसज्ज आहेत. एफएक्स फिक्स्ड बॅटरी श्रेणीमुळे घरात तसेच कार्यालयात चार्जिंग करण्याची सुविधाही यामध्ये आहे.
इलेक्ट्रिक वाहनांच्या ग्राहकांचा आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांना मन:शांती लाभावी म्हणून पियाजिओ अनोख्या सेवाही देऊ करत आहे. वाहनांना ३ वर्षे/१ लाख किलोमीटर्ससाठी ‘सुपर वॉरंटी’ संरक्षण आहे. याशिवाय, पियाजिओ ३ वर्षांचे फ्री मेंटेनन्स पॅकेजही ग्राहकांना सुरुवातीला देऊ करत आहे. पियाजिओ आय-कनेक्ट टेमीमॅटिक्स सोल्युशन ग्राहकांना वाहनाचा माग ठेवण्यासाठी तसेच पीव्हीपीएल सेवा उपक्रमांसाठी रिअल-टाइम तत्त्वावर वाहनविषयक डेटा पुरवते.















