मर्सिडीझ बेंझच्या पुण्यातील चाकण येथील अत्याधुनिक कारखान्यात आता १३ मॉडेल्स तयार केली जातात.
नवीन एस-क्लास भारतात प्रथमच सादर सादर करत आहे आधुनिक टेलिमॅटिक्सच्या उपयोगात क्रांती घडवून आणणारे अभिनव ‘कार टू एक्स‘ कम्युनिकेशन्स
मर्सिडीझ-बेंझ इंडियाने आजवर भारतीय ग्राहकांना ८२५० एस-क्लास गाड्या विकल्या आहेत.
एस-क्लासच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये आणण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानांमध्ये रोबोट्स, विविध एआर / व्हीआर बेस्ड ट्रेनिंग मोड्यूल्सचा समावेश आहे.
- सुरक्षितता हे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या नव्या एस-क्लासमध्ये आता ड्रायव्हिंग असिस्टंस पॅकेज ५.० देखील असून या अत्याधुनिक पॅकेजमध्ये नवीन आणि सुधारित फंक्शन्सचा समावेश आहे.
- यामध्ये ऍक्टिव्ह ब्रेक असिस्ट, प्री-सेफ प्लस, प्री-सेफ इम्पल्स साईड, ऍक्टिव्ह पार्किंग असिस्ट, ऍक्टिव्ह ब्लाइंड स्पॉट असिस्ट, ऍक्टिव्ह लेन कीपिंग असिस्ट, ऍक्टिव्ह स्टीयरिंग असिस्ट, इव्हेसिव्ह स्टीयरिंग, ऍक्टिव्ह डिस्टन्स असिस्ट डिस्ट्रॉनिक आणि अटेन्शन असिस्ट यासारख्या सोफिस्टिकेटेड ऍडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टंस सिस्टिम्सचा (एडीएएस) समावेश आहे.
- डिजिटल लाईट्समुळे उत्कृष्ट लायटिंग कंडिशन्स मिळतात ज्या रस्त्यावरील वाहनांच्या व आजूबाजूच्या परिस्थितीच्या दृष्टीने जास्तीत जास्त अनुकूल पद्धतीने ऍडजस्ट केलेल्या आहेत.
- प्रवाशांचा आराम, सुविधा आणि सुरक्षा यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करत एस-क्लासमध्ये रियर स्क्रीन एंटरटेनमेंट सिस्टिम (आरएसईएस) देण्यात आली आहे जी श्रेणीतील सर्वोत्तम मनोरंजन आणि मसाज फंक्शनॅलिटीज प्रदान करते. मिनी एचडीएमआय पोर्टमार्फत आरएसईएसवर बर्म्सटर थ्रीडी सराउंड साउंड सिस्टिमसह नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटीचा आनंद घेता येतो.
- रियर मसाज सीट्स फंक्शनॅलिटी सर्वोत्तम आराम मिळवून देते, यामध्ये १० विविध मसाज प्रोग्रॅम्समधून आपला आवडता प्रोग्रॅम निवडता येतो.
- एकूण ७१० वॉट्सचे आउटपुट असलेली बर्म्सटर थ्रीडी सराउंड साउंड सिस्टिम सोफिस्टिकेटेड वेहिकल नॉइज कॉम्पेन्सेशन (व्हीएनसी) ड्रायव्हिंग कंडिशन्सनुसार संगीत आणि आवाज ऍडजस्ट करते.
- १९ इंचांचे मल्टी-ट्वीन-स्पोक वजनाला हलके अलॉय व्हील्स एरोडायनॅमिक दृष्ट्या जास्तीत जास्त अनुकूलित करण्यात आले असून त्यांना हाय-शीन फिनिशसह काळा रंग देण्यात आला आहे. २५५/४५ आर १९ टायर्स आहेत.
- सर्व्हिस पॅकेजेस
- कॉम्पॅक्ट पॅकेज: एस४५० (८२,९०० रुपये दोन वर्षांसाठी | एस४५० (९३,५०० रुपये दोन वर्षांसाठी)
- किंमत: एस३५० डी १.५७ कोटी रुपये आणि एस४५० फोरमॅटिक १.६२ कोटी रुपये
पुणे: भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीझ-बेंझने आपली सर्वात नवीन एस-क्लास बाजारपेठेत दाखल केली आहे. ही कार पुण्यातील चाकण येथील मर्सिडीझ-बेन्झच्या अत्याधुनिक उत्पादन कारखान्याच्या असेम्ब्ली लाईन्सवर तयार करण्यात आली आहे. जगातील सर्वोत्कृष्ट कार म्हणून गणली जाणारी नवीन एस-क्लास या ब्रँडची इतकी भुरळ का पडते ते दर्शवते आणि ड्रायव्हिंग असिस्टंस, सुरक्षा व संवाद या सर्व बाबतीत अनेक नवीन मानव-केंद्रित नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह ऑटोमोटिव्ह लक्झरी विभागाची नवी व्याख्या रचत आहे. एस-क्लास आता अधिक जास्त इंटेलिजंट बनली आहे, इतकेच नव्हे तर या गाडीने ड्रायव्हिंग अनुभवाला देखील पूर्णपणे नव्या स्तरावर नेऊन पोहोचवले आहे.
मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मार्टिन श्वेन्क व ऑपरेशन्स विभागाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. पियुष अरोरा यांनी संपूर्णतः नवी ‘मेड इन इंडिया’ एस-क्लास कंपनीच्या असेम्ब्ली लाईन्सवरून रोल-आउट केली असून देशभरातील सर्व मर्सिडीझ-बेंझ फ्रँचायझी पार्टनर्सकडे तसेच मर्सिडीझ-बेंझ इंडियाच्या ई-कॉमर्स चॅनेलवर (www.shop.mercedes-benz.co.in) ती ऑर्डरींगसाठी उपलब्ध असणार आहे.
एस-क्लासच्या सीबीयू “लॉन्च एडिशन” ला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता मर्सिडीझ-बेंझ आपल्या भारतीय ग्राहकांसाठी सादर करत आहे स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेले व्हर्जन, जे मर्सिडीझ-बेंझच्या या सर्वात प्रमुख गाडीसाठीच्या ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करेल. एस-क्लासच्या उत्पादनामध्ये पुण्यातील चाकण येथील मर्सिडीझ-बेंझ इंडियाच्या जागतिक दर्जाच्या उत्पादन कारखान्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण सुविधांना समाविष्ट करण्यात आले आहे. संपूर्णपणे अचूक, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि लवचिक प्रक्रिया यामुळे या उत्पादनाचा दर्जा जागतिक पातळीवरील सर्वाधिक काटेकोर मानकांना अनुसरून असून त्यामुळे भारतात लक्झरी गाडयांच्या उत्पादनामध्ये नवा मापदंड रचला गेला आहे.
नवीन एस-क्लासमध्ये कारसाठीच्या डिजिटायझेशनचा उपयोग करण्यात आला आहे, जे गाडीतील ड्रायव्हर आणि प्रवासी या दोघांच्याही गरजा व इच्छांना खूप छान प्रतिसाद देते. नवीन एस-क्लास सादर करून मर्सिडीझ-बेंझने लक्झरी ऑटोमोटिव्ह विभागातील डिझाईन नावीन्य, श्रेणी कामगिरी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा दर्जा सातत्याने उंचावण्याची आपली परंपरा कायम राखली आहे.
मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ श्री. मार्टिन श्वेन्क यांनी सांगितले, “एस-क्लासच्या प्रत्येक नव्या आवृत्तीची अतिशय आतुरतेने वाट पाहिली जाते आणि एस-क्लासची प्रत्येक नवी आवृत्ती ऑटोमोटिव्ह उद्योगक्षेत्रामध्ये नवे मापदंड रचते. सध्याच्या काळातील ‘वर्ल्ड लक्झरी कार‘ नवीन एस-क्लास अद्वितीय नावीन्य, तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि आराम यांच्या सर्वोच्च मानकांसह सर्वाधिक पसंतीची उत्पादने सादर करण्याची मर्सिडीझ-बेंझची महत्त्वाकांक्षा अधोरेखित करते. उदाहरणार्थ, कार टू एक्स कम्युनिकेशन हे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य भारतीय बाजारपेठेत पहिल्यांदाच या कारमध्ये आम्ही सादर करत आहोत, हे वैशिष्ट्य काही विशेष परिस्थितींसाठी खास तयार करण्यात आले असून ते आराम आणि सुरक्षा वाढवते व कारमध्ये टेलिमॅटिक्सच्या वापरामध्ये आधुनिक काळात नवा मापदंड रचते.”
श्री. श्वेन्क यांनी पुढे सांगितले, “न्यू जनरेशन एस-क्लासला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत आणि ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आता आम्ही आमच्या नियोजनाच्या आधीच स्थानिक उत्पादन सुरु करत आहोत. आम्हाला पक्की खात्री आहे की, स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेली एस-क्लास देखील भारतातील चोखंदळ व जाणकार ग्राहकांचा विश्वास जिंकेल आणि त्यांना अतुलनीय महत्त्वाकांक्षी मूल्य प्रदान करेल.”
मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे ऑपरेशन्स विभागाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री. पियुष अरोरा यांनी सांगितले, “नवीन एस-क्लास हे आमचे प्रमुख उत्पादन असून मर्सिडीझ-बेंझच्या जागतिक पोर्टफोलिओमधील सर्वाधिक सोफिस्टिकेटेड आधुनिक लक्झरी कारमध्ये तिचा समावेश होतो. भारतातील असेम्ब्ली लाईन्सवर ही प्रमुख लिमोझिन तयार करणे ही आमच्या संपूर्ण प्रोडक्शन टीमसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. सर्वाधिक प्रगत एस-क्लासच्या स्थानिक उत्पादनासाठी तितक्याच प्रगत उत्पादन प्रक्रिया आवश्यक असतात आणि जागतिक पातळीवरील अतिशय काटेकोर गुणवत्ता मानकांचे पालन करावे लागते. मेड इन इंडिया एस-क्लास आम्ही उत्पादनामध्ये गेली २७ वर्षे ज्या प्रगत प्रक्रिया आणि नाविन्याचा उपयोग करत आहोत त्यामधील लक्षणीय प्रगती दर्शवते. नवीन एस-क्लास सादर करून आम्ही आमच्या चोखंदळ व जाणकार ग्राहकांना जागतिक दर्जाची, भारतात तयार करण्यात आलेली उत्पादने उपलब्ध करवून देण्याची परंपरा पुढे चालवत आहोत.”
श्री. अरोरा पुढे म्हणाले, “एस-क्लासला ज्याप्रकारचे उत्पादन अपेक्षित आहे त्यानुसार आम्ही अनेक नवीन तंत्रज्ञाने आणि प्रक्रियांचा अवलंब केला, यामध्ये ऑपरेटर्सच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी होलो-लेन्ससह वापरण्यात आलेल्या ऑगमेंटेड रिऍलिटीवर आधारित तंत्रज्ञानाचा देखील समावेश आहे. व्हील अलाइनमेंटसाठी एक विशेष प्रक्रिया निर्माण करण्यात आली आहे. ऑटोमॅटिक रोबोटिक ग्ल्युइंगमुले नवीन ब्रेक फिलिंग प्रक्रियेचा उपयोग किंवा जलद असेम्ब्ली प्रक्रिया सुनिश्चित केली जाते ज्यामुळे वेहिकल रिस्पॉन्सेस जलद मिळतात, आम्ही एस-क्लास उत्पादनामध्ये अनेक नवीन तंत्रज्ञानपूर्ण नावीन्य आणि सुधारणा सादर केल्या आहेत.” श्री. अरोरा यांनी एस-क्लासच्या उत्पादनामध्ये समावेश करण्यात आलेल्या प्रमुख तंत्रज्ञानांबाबत आणि प्रगतींबाबत माहिती देताना पुढील गोष्टींचा उल्लेख केला –
नवीन एस-क्लास ३५० डी आणि ४५० फोरमॅटिकची प्रमुख १२ वैशिष्ट्ये:
- सीमलेस डोअर हॅन्डल्स: जेव्हा ड्रायव्हर गाडीच्या जवळ येतो किंवा जेव्हा डोअर हॅन्डलच्या बाह्य पृष्ठभागाला स्पर्श केला जातो तेव्हा हे डोअर हॅन्डल्स इलेक्ट्रिकली एक्सटेन्ड होतात.
- एनटीजी७ एमबीयूएक्स (मर्सिडीझ-बेंझ युजर एक्स्पीरियंस) चे पदार्पण नवीन एस-क्लासमध्ये केले जात आहे. ड्रायव्हर, प्रवासी आणि गाडी यांच्या दरम्यानचे इंटरफेस म्हणून ही गाडी बोर्डवर पाच स्क्रीन्ससह नवे मापदंड रचते. एमबीयूएक्सची कॉम्प्युटिंग शक्ती आधीच्या आवृत्तीमधील सिस्टिमच्या तुलनेत ५०% नी वाढवण्यात आली आहे. याशिवाय नवीन एस-क्लासमध्ये एमबीयूएक्स इंटेरियर व्हॉइस असिस्टंट “हे मर्सिडीझ” ला मागील सीट्सवरून देखील कंट्रोल करता येते.
- ओएलईडी हेड युनिट: संपूर्णतः नवीन ओएलईडी हेड युनिट आता हाय रिजोल्यूशनमध्ये ६४% मोठा स्क्रीन एरिया देते जो अधिक चांगला आणि संवादात्मक युजर इंटरफेस मिळवून देतो. या कारमध्ये नव्याने डिझाईन करण्यात आलेले १२.३ इंचांचे नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे.
- नवीन रियर एमबीयूएक्स टच टॅबलेट: एमबीयूएक्स आरएसईएस व्यतिरिक्त सेंटर कंसोलमध्ये याचा देखील समावेश करण्यात आला आहे.
- मर्सिडीझ मी कनेक्टसोबत पर्सनलायझेशन: पिनच्या क्लासिक एंट्रीसह एक नवीन ऑथेंटिकेशन पद्धत उच्चस्तरीय सुरक्षा सुनिश्चित करते. फिंगरप्रिंट आणि व्हॉइस रेकग्निशन यांना आता एकत्रित करण्यात आले आहे. यामुळे तुम्ही गाडीच्या आत शिरताच इंडिविज्युअल प्रोफाइल सेटिंग्सचा उपयोग लगेचच करू शकता.
- डिजिटल लाईट्समुळे तुम्ही आदर्श लायटिंग कंडिशन्सचा अनुभव घेऊ शकता, ज्या रस्त्यावरील इतर गाड्या, व्यक्ती आणि आजूबाजूची परिस्थिती यानुसार जास्तीत जास्त अनुकूलित करण्यात आलेल्या असतात.
- लेदर इंटेरियर्स: वॉटरफॉल डिझाईनमधील तीन वेगवेगळ्या नवीन छटांमध्ये उपलब्ध.
- रियर मसाज सीट्स: सर्वोत्कृष्ट आराम पुरवतात आणि यामध्ये तब्बल १० वेगवेगळे मसाज प्रोग्रॅम्स आहेत ज्यामधून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही प्रोग्रॅम निवडू शकता.
- फ्रंट सीट कायनेटिक्स: लांबलचक प्रवासात ड्रायव्हरला थकवा जाणवू नये यासाठी पुरवण्यात आले आहेत.
- बर्म्सटर® थ्रीडी सराउंड साउंड सिस्टिम एकूण आउटपुट ७१० वॉट्स असून सोफिस्टिकेटेड वेहिकल नॉइज कॉम्पेन्सेशन (व्हीएनसी) ड्रायव्हिंग कंडिशन्सनुसार संगीत आणि आवाज अड्जस्ट करते.
- ४८.३ सेमी (१९ इंच) मल्टी-ट्वीन-स्पोक वजनाला हलक्या अलॉयचे व्हील्स एरोडायनॅमिकली अनुकूलित करण्यात आले आहे. हाय-शीन फिनिशसह काळ्या रंगात रागावलेले असून ८.५जे X १९ ईटी ३१.५ व्हील्सवर २५५/४५ आर १९ टायर्स आहेत.
- सुरक्षेला नेहमीच सर्वाधिक प्राधान्य देण्याच्या धोरणानुसार नवीन एस-क्लासमध्ये ड्रायव्हिंग असिस्टंस पॅकेज ५.० आहे. या अत्याधुनिक पॅकेजमध्ये नवीन आणि सुधारित फंक्शन्सचा समावेश आहे.
| मर्सिडीझ-बेंझ एस-क्लासची तांत्रिक वैशिष्ट्ये | ||
| एस ३५० डी फोरमॅटिक | एस ४५० फोरमॅटिक | |
| इंजिन | ओएम ६५६, इन-लाईन ६ सिलिंडर | एम २५६, इन-लाईन ६ सिलिंडर |
| डिस्प्लेसमेंट | २९२५ सीसी | २९९९ सीसी |
| रेटेड आउटपुट | ३६००-४२०० आरपीएमला २१० केडब्ल्यू (२८६ एचपी) | ५५००-६१०० आरपीएमला २७० केडब्ल्यू (३६७ एचपी) |
| रेटेड टॉर्क | १२००-३२०० आरपीएमला ६०० एनएम | १६००-४५०० आरपीएमला ५०० एनएम |
| ऍक्सिलरेशन ०-१०० किमी प्रति तास | ५.४ एस | ५.१ एस |
| सर्वाधिक वेग | २५० किमी प्रति तास | |
| लांबी/रुंदी/उंची (एमएम मध्ये) | ५२८९ / १९५४ / १५०३ | |
| व्हीलबेस (एमएम मध्ये) | ३२१६ | |
भारतीय ग्राहकांसाठी, भारतात बनवलेल्या नवीन एस-क्लासची उत्पादन वैशिष्ट्ये:
- ८० पेक्षा जास्त कंट्रोल युनिट्स: नवीन एस-क्लासमध्ये अत्याधुनिक मोबाईल टेस्टर्स वापरून ८० पेक्षा जास्त कंट्रोल युनिट्सचे इलेक्ट्रॉनिकल परीक्षण करण्यात आले व ती सुरु करण्यात आली आहेत.
- परीक्षण प्रणाली उन्नत करण्यासाठी एमएल आणि एआयचा वापर: ग्राहकांचे आचरण सिम्युलेट करणाऱ्या सुविकसित अल्गोरिदम्सच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक प्रणालींचे असामान्य आचरण ओळखण्यासाठी एस-क्लासमध्ये डायग्नोसिस सिस्टिमचा उपयोग केला जातो. प्रचंड मोठ्या टेस्टिंग सिस्टिम्ससाठी मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हे अल्गोरिदम्स सातत्याने उन्नत केले जातात.
- संपर्करहित व्हील अलाइनमेंट प्रक्रिया: ड्रायव्हिंग अनुभव अधिकाधिक समृद्ध व्हावा यासाठी आता संपर्करहित व्हील अलाइनमेंट प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे जी एयरमॅटिक सस्पेन्शन सिस्टिम्ससह स्वयंचलित व्हील अलाइनमेंट आणि राईड हाईट कॅलिब्रेशनची हमी देते. यामुळे ग्राहकांना इकॉनॉमी, कम्फर्ट किंवा स्पोर्ट्स सस्पेन्शन्सदरम्यान सीमलेस ट्रान्झिशन मिळते.
- सीमलेस डोअर हॅन्डल्ससाठी नवीन असेम्ब्ली प्रक्रिया: नवीन एस-क्लासचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सीमलेस डोअर हॅन्डल्स. ग्राहकांना अधिक जास्त जास्त आराम आणि सुविधा मिळाव्यात तसेच कारचे एरोडायनॅमिक्स वाढावेत यासाठी सीमलेस डोअर हॅन्डल फिटमेन्टसाठी संपूर्णतः नवीन असेम्ब्ली प्रक्रिया विकसित करण्यात आली आहे.
नवीन एस-क्लास उत्पादनामध्ये वापरण्यात आलेले नावीन्य आणि नवीन तंत्रज्ञान
- अत्याधुनिक ग्ल्युइंग रोबोट्सचा उपयोग: अत्याधुनिक ग्ल्युइंग रोबोट्स आता वापरण्यात येत आहेत ज्यामुळे काच व मेटल बॉडी पार्ट्समधील सांध्यांची हवाबंद जोडणी करण्याबरोबरीनेच असेम्ब्ली प्रक्रिया देखील जलद गतीने होते, यामुळे अधिक जास्त आराम, अधिक जास्त सुरक्षितता व पहिल्यापेक्षा अधिक शांत केबिन यांचा अनुभव गाडीतील प्रवाशांना मिळतो.
- नवीन कॉम्पॅक्ट व्हीआयएन इंग्रेव्हिन्ग मशीन: यामुळे ग्राहकांना सुरक्षितता व सहज पोहोच हे लाभ मिळतात.
- कमी एनव्हीएच: ड्राइव्ह ट्रेन असेम्ब्लीमधील नवीन मानके आणि पॅसेंजर केबिनसोबत त्यांचा समन्वय हे पहिल्यांदाच कार्यान्वित करण्यात आले आहे, त्यामुळे गाडी ड्राइव्ह करताना व्हायब्रेशन्स व आवाज यांचे प्रमाण कमी होते.
- नवीन ब्रेकिंग सिस्टिम: नवीन ब्रेकिंग सिस्टिम पेडल प्रेसला अधिक जलद प्रतिसाद देते. एका क्लोज्ड लूप इलेक्ट्रॉनिक फीडबॅक सिस्टिमसह नियंत्रित करण्यात येणाऱ्या व्हॅक्युम बेस्ड फिलिंग आणि टेस्टिंग प्रक्रिया घडवणाऱ्या नवीन तंत्रज्ञान फिलिंग सिस्टिमच्या मदतीने हे संभव करण्यात आले आहे. डायनॅमोमीटर ब्रेक टेस्ट विविध आरपीएम आणि टॉर्क्सना ग्राहकांचे आचरण सिम्युलेट करते आणि सर्व ड्रायव्हिंग परिस्थितींमध्ये वाहनांची प्रतिक्रिया जलद गतीने व सुरक्षितपणे व्हावी हे सुनिश्चित करते.
पर्यावरणस्नेही व शाश्वत उत्पादन प्रक्रिया विकसित करणे:
कार्बन तटस्थ उत्पादन हे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्णतः शाश्वत, पर्यावरणस्नेही उत्पादन प्रकिया उभारण्याच्या दिशेने मर्सिडीझ-बेंझ इंडिया वाटचाल करत आहे. डिजिटल जॉब कार्ड्स व डिजिटली चालवण्यात येणाऱ्या शॉप फ्लोर मॅनेजमेंट डॅशबोर्डचा व्यापक वापर करत मर्सिडीझ-बेंझ इंडिया हे पेपरलेस प्रोडक्शन युनिट म्हणून काम करत आहे. ट्रिम आणि मेकॅनिकल असेम्ब्लीपासून सर्वत्र डिजिटल जोडण्यात आलेल्या तंत्रज्ञानांचा वापर केला जात असून कंपनी शाश्वत शॉप-फ्लोर ऑपरेशन्सच्या दिशेने योग्य पावले उचलत आहे. वेहिकल टेस्टिंग आणि डेटाचे लाईव्ह सिंथेसिसचे विविध टप्पे मर्सिडीझ-बेंझ इंडियाच्या डिजिटली चालवण्यात येत असलेल्या फॅक्टरीच्या निर्मितीमध्ये इंडस्ट्री ४.० आणि एम०३६० ला अनुसरून आहेत.
२०२२ पर्यंत मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे संचालन १००% हरित उर्जेवर होणार
मर्सिडीझ-बेंझ इंडियाने शाश्वतता आणि पर्यावरणस्नेह या मुद्द्यांवर प्रामुख्याने भर दिला आहे. यासाठी कचरा निर्माण होण्याचे प्रमाण कमी करणे, पाणी, वीजया सुविधांच्या वापरामध्ये घट आणि कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मर्सिडीझ-बेंझच्या जागतिक अँबिशन २०३९ चा एक भाग म्हणून कंपनीचा प्रमुख उद्देश उत्पादन प्रक्रिया आणि पुरवठा शृंखला कार्बन तटस्थ बनवणे हा आहे. यादृष्टीने भारतीय उत्पादन कारखाना २०२२ सालापर्यंत १००% हरित उर्जेवर चालू लागावा असे प्रयत्न केले जात आहेत.
२०२० साली मर्सिडीझ-बेंझ इंडियाने १.६ मेगावॅट क्षमतेचा महत्त्वाकांक्षी सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण केला आणि सध्या ही कंपनी २.० मेगावॅट क्षमतेच्या आणखी एका प्रकल्पावर काम करत आहे जो २०२१ च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल. यामुळे दरवर्षी जवळपास ३७०० टन कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन रोखले जाईल. आपला उत्पादन कारखाना संपूर्णतः शाश्वत आणि पर्यावरणस्नेही बनावा ही मर्सिडीझ-बेंझ इंडियाची महत्त्वाकांक्षा असून ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जात आहेत.















