मुंबई, 6 मे, २2021 : भारतातील कोविडविरुद्धच्या लढ्यात आपले योगदान देण्याच्या हेतूने ‘डिस्ने आणि स्टार इंडिया’ने 50 कोटींची आर्थिक मदत देण्याचे वचन दिले आहे. या रकमेचा उपयोग ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, बायपॅप, व्हेंटिलेटर्स आदींसह महत्त्वाच्या आरोग्य उपकरणांच्या खरेदीसाठी, तसेच रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी केला जाईल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर मात करण्यात सरकार व आरोग्यसेवा कर्मचारी यांच्या मदतीसाठी उद्योग क्षेत्राच्या एकत्रित प्रयत्नांची पूर्तता करण्याकरीता ही मदत असल्याचे ‘डिस्ने व स्टार इंडिया’तर्फे सांगण्यात आले. ट्विटरच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आली.
https://twitter.com/DisneyIndia/status/1389849924401995786
या उद्देशाला पाठिंबा दर्शविताना, ‘द वॉल्ट डिस्ने कंपनी इंडिया व स्टार इंडिया’चे अध्यक्ष के. माधवन यांनी ट्वीटद्वारे म्हटले आहे, “कोविड-19विरुद्धच्या लढ्यात आम्ही संपूर्ण भारताबरोबर एकजूटीने उभे आहोत. या लढ्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने ‘वॉल्ट डिस्ने कंपनी व स्टार इंडिया’ 50 कोटी रुपयांचे योगदान नम्रपणे देत आहे. जीव वाचविण्यासाठी अत्यावश्यक आरोग्यसेवा आणि उपकरणे पुरविणे ही काळाची गरज आहे. हा आपला सामाईक लढा आहे. भारताबद्दलच्या आमच्या दृढ वचनबद्धतेची पुष्टी आमच्या या योगदानातून होत आहे. आमच्या कंपनीने 2020मध्ये ‘कोविड-19’च्या लढ्याकरीता 28 कोटी रुपयांचे योगदान दिले होते. त्या आधारावरच आम्ही आताची मदत देऊ करीत आहोत.”
‘द वॉल्ट डिस्ने कंपनी व स्टार इंडिया’ने ‘कोविड-19’च्या लढ्याकरीता 28 कोटी रुपयांचे योगदान 2020 मध्ये दिले होते. त्या व्यतिरिक्त हे आताचे साह्य आहे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांविषयी (कोविड अॅप्रोप्रिएट बिहेवियर – सीएबी) जागरुकता निर्माण करण्यासाठी स्टार इंडिया नेटवर्क सार्वजनिक सेवा घोषणेद्वारे (पीएसए) जनजागृती मोहीम राबवीत आहे.
कंपनी आपल्या ‘डिस्ने एम्प्लॉई मॅचिंग गिफ्ट्स प्रोग्राम’च्या माध्यमातून मदतकार्यास पाठिंबा देत राहील. यामध्ये, पूर्व-मंजूर धर्मादाय संस्थांना कर्मचारी जितक्या रकमेच्या देणग्या देतील, तेवढी भर कंपनी त्यात स्वतः घालेल.