रत्नागिरी, विशेष प्रतिनिधीः- जिल्ह्यातील आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर सहा तरुण पोहण्यासाठी उतरले होते. त्यापैकी तिघांची बुडून मृत्यू झाल्याची घटना दापोलीत घडली. पुण्यातील औंध भागातून हे पर्यटक फिरण्यासाठी आले होते.
पुण्यातील औंध येथील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह १४ पर्यटक फिरण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. पोहण्यासाठी ते पाण्यात उतरले असता असताना पाण्याचा अंदाज न आल्याने हे सहाही पर्यटक पाण्यात बुडाले. ही घटना किनाऱ्यावर असलेल्या स्थानिकांच्या निर्दशनास आली. त्यामुळे तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. बुडालेल्या सहा पर्यटकांपैकी तीन पर्यटकांचा यावेळी बुडून मृत्यू झाला. उर्वरित तिघांना वाचविण्यात आले असून त्यांच्यावर दापोलीतील शासकीय रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले आहे. दापोली पोलिस ठाणे याप्रकरणाची चौकशी करत आहेत.