नवी दिल्ली : कंबाइन कमांडर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज जोधपूर येथे आगमन झाले. जोधपूर हवाई दलाच्या ठाण्यावर आगमन झाल्यानंतर पंतप्रधानांनी तीनही सेवा दलांच्या गार्ड ऑफ ऑनरची पाहणी केली.
कोणार्क युद्ध स्मृतीस्थळी पंतप्रधानांनी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. मातृभूमीचे निष्ठेने रक्षण करणाऱ्या लष्कराचा देशाला अभिमान आहे अशा भावना पंतप्रधानांनी अतिथींसाठीच्या पुस्तकात प्रतिक्रिया लिहिताना व्यक्त केल्या. देशासाठी सर्वोच्च बलीदान करणाऱ्या आणि पिढ्यानपिढ्या स्फुर्तीचे प्रतिक राहिलेल्या शूरवीरांचे स्मरण करत त्यांनी आदरांजली अर्पण केली.
कोणार्क स्टेडिअममध्ये पंतप्रधानांनी “पराक्रम पर्व” चे उद्घाटन केले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनालाही पंतप्रधानांनी भेट दिली.