रत्नागिरी : शुक्रवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात पेट्रोल-डिझेलवर 1 रुपयांचा कर वाढल्याच जाहीर करण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मध्यरात्री जी पेट्रोल डिझेल दरात वाढ झाली ती अडीच रुपयांपर्यंत झालेली दिसत आहे. मात्र, पेट्रोल डिझेल आणखी तीन रुपयांपर्यंत महाग होण्याची शक्यता आहे. कारण पेट्रोलची स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटी 7 वरून 10 रुपयांवर करण्यात आली आहे. डिझेलची स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटी 1 रुपयांवरून 4 करण्याची करण्यात आली आहे. त्यामुळे स्पेशल ऍडीशनल एक्साइज ड्युटीमध्ये प्रत्येकी 3 रुपयांची वाढ करून ठेवण्यात आली आहे.
तसेच रोड ऍण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सेझ पेट्रोल आणि डिझेलवर 8 वरून 10 रुपये करण्यात आला अहे. त्यामुळे रोड सेझमध्ये देखील 2 रुपयांची वाढ करून ठेवण्यात आली आहे. म्हणजे एकूण 5 रुपयांची ही वाढ आहे. त्यापैकी 2 रुपयांची वाढ रात्री करण्यात आली. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवर व्हँट 25 टक्के लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर आज सव्वा दोन ते अडीच रुपयांनी वाढले आहे.. मात्र येत्या काही दिवसांत सरकारने ठरवल्यास पेट्रोल डिझेल आणखी 3 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. फामपेडा अध्यक्ष उदय लोध यांनीच ही माहिती दिली आहे..