
मालाड, ता. 24(बातमीदार) : प्रकाश आनंद प्रतिष्ठानचा क्रियाशील सामाजिक कार्यकर्ता हा मानाचा समाजाला जाणारा पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद निगुडकर प्रदान करण्यात आला. पुरस्कार सोहळा मालाड मधील ठाणेकर हाऊस, प्रकाश आनंद भवन मध्ये दिनांक 23 मार्च रोजी पार पडला.
ज्येष्ठ सामाजसेवक स्व. कमलाकर ठाणेकर यांच्या अकराव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रकाश आनंद प्रतिष्ठानने दरवर्षी प्रमाणे सामाजिक कार्याबद्दलचा समाजसेवा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला होता. या वर्षी या पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रमोद निगुडकर यांची निवड झाली.
ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा जोशी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये 25 हजार चा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यकारी विश्वस्त नरेंद्र मेस्त्री, विश्वस्त सिद्राम बंडगर, कवियत्री नीरजा, निगुडकर यांचे कुटुंबीय, मित्र तसेच मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, अपना बाजारचे संचालक जगदीश नलावडे यांनी प्रमोद निगुडकर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील सामाजिक वाटचालिस शुभेच्छा दिल्या.















