ना. रामदास आठवले. मंत्री भरतशेठ गोगावले , खासदार पद्मश्री उज्वल निकम उपस्थित

Mumbai : भांडुप(प) येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर. के. विधी महाविद्यालयाचा दिमाखदार राजेशाही उद्घाटन सोहळा व रमेश खानविलकर यांच्या इंग्रजी जीवन चरित्र Stormy path पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले, रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले, राष्ट्रपती नवनियुक्त राज्यसभा सदस्य पद्मश्री उज्वल निकम, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे अध्यक्ष विठ्ठल कोंडे देशमुख, आमदार अशोक पाटील, शिवसेना सचिव राम रेपाळे ,प्रकाशक अक्षय सोन्थालिया यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
विधी महाविद्यालय उद्घाटन सोहळा व Stormy path या इंग्रजी पुस्तक प्रकाशनास मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,मा.मंत्री नितेश राणे, मा. मंत्री आदिती तटकरे ,ना. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शुभेच्छापत्र देऊन रिद्धेश रमेश खानविलकर यांचे अभिनंदन केले आहे
याप्रसंगी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदासजी आठवले म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी द पीपल एज्युकेशन शिक्षण संस्थेची स्थापना करून गोरगरीब, दलित ,मागासवर्गीयांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. द पीपल एज्युकेशनच्या अनेक शाळा महाविद्यालयातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याच धर्तीवर रमेश खानविलकर यांनी गेले ३१ वर्ष अनेक शाळा महाविद्यालय स्थापन करून गोरगरीब, दलित, मागासवर्गीयांना शिक्षणाची सुविधा निर्माण करून देत आहेत. संपूर्ण खानविलकर कुटुंबीय शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा सुपुत्र रिद्धेश खानविलकर तो वसा पुढे चालवत आहे.ही बाब महाराष्ट्रातील तरूणांना प्रेरणा देणारी आहे.
राष्ट्रपती नवनियुक्त राज्यसभा खासदार पद्मश्री उज्वल निकम म्हणाले की, मुंबईत विशेषता ईशान्य मुंबईत विधी महाविद्यालयाची नितांत आवश्यकता होती. याबाबत परिपूर्ण अभ्यास करून रिद्धेश खानविलकर यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ईशान्य मुंबईत आर. के. विधी महाविद्यालयाची उभारणी केली याचा फायदा अनेकांना होणार आहे. नवीन विधी महाविद्यालय सुरू करणे सामान्य बाब नाही, अनेक बाबींची पूर्तता करावी लागते हे ‘शिव धनुष्य’ रिद्धेश खानविलकर सारख्या मराठी युवकाने समर्थपणे पेलले याचा मला अभिमान आहे.त्याचातील विनम्रता मला भावली आहे.

याप्रसंगी प्रकाशित झालेले रमेश खानविलकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित “Stormy path ”हे पुस्तक अनेकांना मार्गदर्शन ठरणार आहे. महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले म्हणाले की. रिद्धेश खानविलकर आमच्या कोकणातील उच्चशिक्षित मराठी तरुणाने मुंबई सारख्या शहरात वडिलांकडून आदर्श घेऊन विधी महाविद्यालयाची सुरुवात करत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. मा.उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या कार्यक्रमाला येणार होते पण पुण्यात एका शासकीय कार्यक्रमात ते असल्याने वेळेत ते पोहोचू शकले नाहीत. त्यांच्या वतीने मी आश्वासन करतो, रिद्धेश खानविलकर तुम्ही मुंबई शहरात संस्था काढल्यात तशा कोकणात विशेषता माणगाव, महाड,पोलादपुर या परिसरात व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षण संस्था सुरू कराव्यात. मी व आपले शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू कोकणच्या विकासासाठी याची गरज आहे. .
ईशान्य मुंबईतील अनेक वकील,डॉक्टर,प्राध्यापक,शिक्षक ,पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक,सर्व पक्षाचे पदाधिकारी प्रचंड प्रमाणात कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते.















