मालाड, ता.8 (वार्ताहर) : फादर स्टॅन स्वामी यांच्यासाठी ओरलेम येथील अवर लेडी ऑफ लॉर्डेस चर्च येथे विशेष प्रार्थना सभेचे आयोजन बॉम्बे कॅथलिक सभा मालाड शाखेच्या वतीने करण्यात आले. संध्याकाळी 5.30 ते 6.30 च्या दरम्यान विशेष सभाप्रसंगी बॉम्बे कॅथलिक सभाचे प्रवक्ता डॉल्फि डिसोझा व नॉर्बर्ट मेंडोंसा यांच्या नेतृत्वाखाली सभेचे सदस्य तसेच चर्चचे फादर आणि ख्रिस्ती समाजातील नागरिकांनी फादर स्टॅन स्वामी यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचा मृत्यू हा संस्थामक खून आहे, असा आरोप करत शांतीपूर्ण मार्गाने चर्चच्या बाहेर निदर्शने करण्यात आली.














