मुंबई, १६ जानेवारी २०२५: नैतिक आणि शाश्वत सौंदर्याशी जपलेल्या कटिबद्धतेसाठी ओळखले जाणा-या द बॉडी शॉपने जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत चालणाऱ्या नॉकआउट सेलची घोषणा केली आहे. नॉकआउट सेलमध्ये निवडक उत्पादनांवर ५० टक्क्यांपर्यंतची सूट आहे, ज्यामुळे आपल्या बजेटला न ताणता उच्च दर्जाची, व्हिगन सौंदर्य उत्पादने विकत घेणे कधी नव्हे इतके सोपे झाले आहे.
हा सेल फक्त स्किनकेअरपुरता मर्यादित नाही, कारण यात तुमच्या लूकमध्ये सहजपणे परिवर्तन घडवून आणणाऱ्या मेकअपसाठी आकर्षक डील्सचाही समावेश आहे. त्वचेला आर्द्रता पुरविणाऱ्या फ्रेश न्युड फाउंडेशनपासून ते बहुगुणी फ्रीस्टाइल मल्टि-टास्किंग कलर फ्लो व पेपटॉक लिपस्टिक कलेक्शनच्या ठळक, उठावदार छटांपर्यंत विविध उत्पादनांच्या साथीने आपला मेकअप गेम उंचावण्याची हीच संधी आहे.
या उत्साहात आणखी भर टाकण्यासाठी द बॉडी शॉपने विचारपूर्वक तयार केलेले प्री-पॅक्ड गिफ्ट सेट्स हे तर या नॉकआउट सेलचे ठळक वैशिष्ट्य आहे. वाढदिवस, अॅनिव्हर्सरीजसाठी किंवा सहजच इतरांना आनंद देण्यासाठी हे सेट्स भेटवस्तूचा एक आदर्श पर्याय देऊ करतात, ज्यात उच्च दर्जाची उत्पादने आणि नैतिक मूल्यांच्या जपणूकीची सांगड घालण्यात आली आहे. प्रत्येक बजेटला साजेसे पर्याय देऊ करत हे सेट्स भेटवस्तू निवडण्याची प्रक्रिया जितकी अर्थपूर्ण असेल तितकीच विनासायास असावी याची काळजी घेतात.
द बॉडी शॉप ग्राहकांना अविश्वसनीय ऑफर्सची चैन अनुभवण्यासाठी आमंत्रित करत आहे व या सेलमुळे हा काळ सौंदर्य प्रसाधनांपैकी आपल्या आवडीची उत्पादने पुन्हा खरेदी करण्याचा आणि प्रत्येक प्रसंगासाठी अर्थपूर्ण भेटवस्तूचा शोध घेण्यासाठीचा आदर्श काळ बनला आहे.