~ त्वचा व केसांची काळजीसाठी उपयुक्त घटक समाविष्ट ~
मुंबई, 28 एप्रिल : ब्रिटीश-स्थित एथिकल ब्युटी ब्रॅण्ड द बॉडी शॉपची आयकॉनिक टी ट्री श्रेणी उन्हाळ्यामध्ये थंडावा जाणवण्यास मदत करण्यासोबत तेजस्वी व कोमल त्वचा आणि आरोग्यदायी केस मिळण्याची खात्री देईल. नैतिकदृष्ट्या उच्च दर्जाच्या घटकांना दीर्घकाळापासून प्राधान्य दिलेल्या ब्रॅण्डची कम्युनिटी फेअर ट्रेड केनियन टी ट्रीसह निर्माण केलेल्या टी ट्री कलेक्शनमध्ये १८ उत्पादने आहेत. आहेत. २० वर्षांपासून द बॉडी शॉप स्टोअर्स व ऑनलाइन उपलब्ध असलेली या आयकॉनिक श्रेणीमध्ये टी ट्री ऑल-इन-वन स्टिक, टी ट्री स्किन कंट्रोल हायड्रेटर, टी ट्री अॅण्टी-इम्परफेक्शन नाइट मास्क, टी ट्री अॅण्टी-इम्परफेक्शन डेअली सोल्यूशन, टी ट्री मॅटिफाईंग टोनर, टी ट्री स्किन क्लीअरिंग क्ले मास्क, टी ट्री स्किन क्लीअरिंग फेशियल वॉश, टी ट्री ऑईल, टी ट्री प्युरिफाईंग अॅण्ड बॅलन्सिंग शॅम्पू, टी ट्री प्युरिफाईंग अॅण्ड बॅलन्सिंग कंडिशनर आदी उत्पादनांचा समावेश आहे.
टी ट्री ऑल-इन-वन स्टिक, १२९५ रूपये:
द बॉडी शॉपचे टी ट्री ऑल-इन-वन स्टिक हायड्रेटर हे सोयीस्कर व बहु-उद्देशीय उत्पादन त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करते, फक्त एकाच स्वाइपमध्ये ते त्वचेला कोमलता व रिफ्रेशपणा देते; दिवसभर त्वचा तेजस्वी ठेवण्यासाठी हे उत्पादन दैनंदिन स्किनकेअर रूटिनचा भाग म्हणून, तसेच मेकअपसाठी बेस किंवा टॉप-अप म्हणून वापरता येऊ शकते. ९५ टक्के नैसर्गिक घटकांसह तयार करण्यात आलेल्या स्टिक हायड्रेटरमध्ये केनियन टी ट्री ऑईल व सॅलिसायलिक अॅसिड आहे, जे असमान त्वचा रचनेला कोमलता देते. हे उत्पादन वेगन सोसायटी प्रमाणित आहे.
टी ट्री स्किन कंट्रोल हायड्रेटर, १०४५ रूपये:
प्रसिद्ध गैरसमजांच्या तुलनेत तेलकट त्वचेमधील पाण्याचे प्रमाण कमी होत निर्जलीकरण (हायड्रेटेड) देखील होते. द बॉडी शॉपचे टी ट्री इन-कंट्रोल हायड्रेटर या समस्येसाठी उपुयक्त आहे. हे उत्पादन अधिक भडक किंवा तेलकट न दिसता दिवसभर त्वचेमधील ओलावा कायम ठेवते. हे त्वचेमध्ये त्वरित शोषले जाते आणि क्रीमवरून अत्यंत हलक्या हायड्रेटिंग लिक्विडमध्ये बदलते, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी असल्यासारखे वाटते. केनियामधील कम्युनिटी फेअर ट्रेड टी ट्री ऑईलपासून बनवण्यात आलेल्या टी ट्री इन-कंट्रोल हायड्रेटरसह तुमची त्वचा तेजस्वी व कमी भडक दिसते.
टी ट्री अॅण्टी-इम्परफेक्शन नाइट मास्क, १९९५ रूपये:
आपण आपली त्वचा एका रात्रीत डाग-मुक्त करू शकलो तर! द बॉडी शॉपच्या टी ट्री अॅण्टी-इम्परफेक्शन नाइट मास्कसह तुम्ही असे करू शकता. विशेषत: तेलकट त्वचेसाठी सॅलिसायलिक अॅसिड आणि ब्रॅण्डच्या कम्युनिटी फेअर ट्रेड केनियन टी ट्री ऑईलसह तयार करण्यात आलेला हा १०० टक्के वेगन लीव्ह-ऑन नाइट मास्क सकाळी उठल्यानंतर तेजस्वी, कोमल, निस्तेज व रिफ्रेश त्वचा देतो.
टी ट्री अॅण्टी-इम्परफेक्शन डेअली सोल्यूशन, १६९५ रूपये:
दिवसभरात आपल्याला प्रदूषणामुळे विशिष्ट कण व धूळीचा सामना करावा लागतो. प्रदूषणाच्या प्रतिकूल परिणामांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले द बॉडी शॉपचे टी ट्री अॅण्टी-इम्परफेक्शन डेअली सोल्यूशन त्वचेवरील डागांना दूर करते आणि त्वचेच्या एकूण स्थितीमध्ये सुधारणा करते. कम्युनिटी फेअर ट्रेड टी ट्री ऑईलसह संपन्न १०० टक्के वेगन सोल्यूशन डाग दूर करत त्वचा कोमल बनवते.
टी ट्री मॅटिफाईंग टोनर, ७९५ रूपये:
विशेषत: धूळ व काजळीला दूर करण्यासाठी आणि त्वचेला कोमल करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले द बॉडी शॉपचे टी ट्री मॅटिफाईंग टोनर मेकअप दूर करण्यामध्ये मदत करते आणि त्वचेमधील छिद्रांना स्वच्छ करते, ज्यामुळे त्वचा मॅटिफाईड व शुद्ध होते. हे उत्पादन पूर्णत: वेगन असण्यासोबत दैनंदिन वापरासाठी उपयुक्त आहे आणि ते त्वचेला कोरडे होण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे हे उत्पादन तेलकट त्वचेसाठी परिपूर्ण सोबती आहे.
टी ट्री स्किन क्लीअरिंग क्ले मास्क, ९९५ रूपये:
तुम्ही त्वचेमधील तेजस्वीपणा कमी न करता अतिरिक्त सीबम शोषून घेईल आणि त्वचेला शुद्ध व कोमल बनवेल अशा उत्पादनाचा शोध घेत असाल तर तुमचा शोध द बॉडी शॉपच्या टी ट्री स्किन क्लीअरिंग क्ले मास्कसह संपेल. हा रिन्स-ऑफ मास्क आहे, जो माऊंट केनियाच्या पायथ्याशी विकसित केल्या जाणाऱ्या प्युरिफाईंग टी ट्री ऑईलसह निर्माण करण्यात आला आहे. हा मास्क त्वचेवरील मुरूमा व डागांना दूर करतो.
टी ट्री ऑईल, ६९५ रूपये:
फेशियल ऑईल्स त्वचेसाठी अद्भुत कार्य करू शकतात, पण त्यासाठी सर्वोत्तम घटकांनी युक्त उत्पादनाची निवड करणे गरजेचे आहे. केनियामधील कम्युनिटी फेअर ट्रेड प्रोग्राममधून नैतिकदृष्ट्या स्रोत मिळवलेले द बॉडी शॉपचे टी ट्री ऑईल डागांना दूर करते आणि त्वचा शुद्ध करते, ज्यामुळे त्वचा कोमल व निस्तेज बनते. हे स्टिम-डिस्टिल्ड असण्यासोबत १२ तासांमध्ये हार्वेस्ट साइट सोडत असल्यामुळे सर्वात शुद्ध, सर्वात पोटेण्ट ऑईल आहे आणि जलद उपयोजनेसाठी उपयुक्त आहे. हे १०० टक्के वेगन आहे आणि २० मिलीच्या बॉटलमध्ये १५,००० टी ट्री पानांचे गुणधर्म सामावलेले आहेत.
टी ट्री प्युरिफाईंग अॅण्ड बॅलन्सिंग शॅम्पू, ७४५ रूपये:
तेलकट, खाज सुटणाऱ्या टाळूचा त्रास होत असलेल्यांसाठी द बॉडी शॉपचे टी ट्री प्युरिफाईंग अॅण्ड बॅलन्सिंग शॅम्पू वरदान आहे. द वेगन सोसायटीद्वारे प्रमाणित आणि ९३ टक्के नैसर्गिक घटक असलेला शॅम्पू अविश्वसनीयरित्या कार्यक्षम आहे. हा शॅम्पू टाळू स्वच्छ व आल्हाददायी करतो. वेगन सिल्क प्रोटीन आणि कम्युनिटी फेअर ट्रेड केनियन टी ट्री ऑईलसह तयार करण्यात आलेला हा शॅम्पू अतिरिक्त तेल शोषून घेतो आणि केसांमधील/ टाळूवरील नैसर्गिक तेल कमी करत नाही. यापेक्षा अधिक म्हणजे हे उत्पादन ब्रॅण्डच्या स्थिरता तत्त्वाशी संलग्न आहे आणि बॉटल रिसायकल केलेल्या प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे.
टी ट्री प्युरिफाईंग अॅण्ड बॅलन्सिंग कंडिशनर, ७४५ रूपये:
द बॉडी शॉपच्या टी ट्री प्युरिफाईंग अॅण्ड बॅलन्सिंग शॅम्पूसाठी परिपूर्ण सोबती असलेले हे कंडिशनर केसांना कोमल, हलके व हायड्रेटेड करेल, ज्यामुळे तुम्ही आकर्षक केसांमधून हात फिरवू शकता. यामध्ये मेक्सिकोमधील कम्युनिटी फेअर ट्रेड अॅलो वेरा आणि ९७ टक्के नैसर्गिक घटक आहेत. ते स्ट्रँड्सची दुरूस्ती करण्यासोबत ओलावा कायम ठेवते. हे कंडिशनर द वेगन सोसायटीद्वारे प्रमाणित आहे आणि बॉटल बेंगळुरूच्या रस्त्यांवरील रिसायकल केलेल्या प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे.