ठाणे : ठाणे शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे दुर्लक्ष केले आहे. अगणित खड्यांची जाणीव त्यांना व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी खड्यांमध्ये चक्क मंत्र्यांच्या प्रतिमा रंगवून आंदोलन केले. मनसेने ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हुबेहुब प्रतिमा खड्ड्यांमध्ये रंगवल्या. ठाणेकरांमध्ये चर्चेचा विषय ठरल्या होत्या.
खड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक कोंडीही होत आहे. खड्यांचा निषेध करण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे, मनसे उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे,प्रभाग अध्यक्ष अमोल राणे आणि मनसे शाखाध्यक्ष सागर भोसले , गोकुळ बोरसे यांच्यासह अनेक मनसैनिकांनी बुधवारी टिकुजिनी वाडी येथील निळकंठ ग्रीन येथील रस्त्यावरील खड्यात चक्क पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमा रेखाटल्या.