
ठाणे : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिशनच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ठाणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या प्रभारी समितीतर्फे आयोजित पहिल्या ठाणे फुटबॉल लीगला शनिवारपासून सुरुवात होत आहे. मुंब्र्यातील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम खेळवण्यात येणाऱ्या या लीगमध्ये १६ संघाना सहभाग देण्यात आला आहे. या १६ संघांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली असून दोन महिने रंगणाऱ्या या लीगमध्ये प्रत्येक संघाला साखळी लढतीमध्ये सात सामने खेळायला मिळणार आहेत. शनिवारी मुंब्रा युनायटेड आणि मेरिकेन्स एफ सी या दोन संघातील सामन्याने या लीगचा बिगुल वाजेल. लीगमधील दुसरा सामना मौर्य यंगस्टर्स विरुद्ध अनुमान एफ सी या दोन संघामध्ये होईल. या लीग स्पर्धेची पूर्व तयारी म्हणून ठाण्यातील युवकांसाठी रेफ्री मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रेफ्रीना वरिष्ठ रेफ्री वॉल्टर परेरा, सेबी डिकॉस्टा, मोरे आणि सावंत यांनी मार्गदर्शन केले.
लीगमधील गट विभागणी
अ गट : १) आनंद भारती समाज, २) फुटबॉल लीडर्स अकादमी, ३) मुंब्रा युनायटेड, ४) सहारा एफ सी , ५) लिकांस एफ सी, ६) पहर युनायटेड, ७) यंग गन्स, ८) मेरिकेन्स एफ सी
ब गट : १) ठाणे वॉरियर , २) स्पोर्टींग क्लब डे ठाणे, ३) श्री माँ , ४) अंजुमन एफ सी, ५) ठाणे स्टार्स , ६) मौर्य यंगस्टर्स, ७) ठाणे सिटी एफ सी, ८) मुंब्रा एफ सी.