
तेजस एक्सप्रेसमध्ये काल नाष्ट्यातून 24 प्रवाशांना विषबाधा झाली होती. त्यामुळे चिपळूण रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवून या प्रवाशांना चिपळूनातील रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. या विषबाधेमुळे रेल्वे व्यवस्थापनावर अनेकांनी तोंडसुख घेत चौकशीची मागणी केली होती. दरम्यान या एक्सप्रेसमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाचं कंत्राट आयआरसीटीसी आहे. त्यामुळे आयआरसीटीसीने या प्रकरणाची तातडीने दखल घेत केटरिंग मॅनेजर आणि एरिया मॅनेजर अशा दोघांना निलंबीत केलं आहे. आयआरसीटीसीच्या माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी हि माहिती दिली आहे. मात्र या दोन्ही कर्मचाऱ्याची नावं त्यांनी जाहीर केलेली नाहीत. तसेच ही विषबाधा नेमकी कोणत्या खाद्य पदार्थामधून झाली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.