
रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील कोंड कारुळ येथे एका सहा वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन आहेत.
मुलांच्या हातातील सध्या मोबाईलचा वाढता वापर त्यात मुबलक उपलब्ध असणारे अश्लील साहित्य यामुळे अल्पवयीन मुलांवर वाईट परिणाम होत आहेत. कोंड कारुळमध्ये घडलेल्या या प्रकाराला मोबाईलचं वाढतं फॅड कारणीभूत असल्याची चर्चा आहे. दरम्यान गुहागर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने
सावधगिरी बाळगत गुहागरचे पोलीस निरिक्षक देवेंद्र पोळ या प्रकरणाचा तपास करत आहेत.