मालाड, (निसार अली) : शिक्षक लोकशाही आघाडी(टीडीएफ) चे उपाध्यक्ष लालजी कोरी यांचे पिता होरीलाल कोरी यांचे हृदयाच्या झटक्याने
मालाड येथील खासगी रुग्णालयात दिनांक 21 रोजी निधन झालं. होरीलाल कोरी यांचं वय 62 वर्ष होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, तीन मुलं व नातवंड असा परिवार आहे. कोरी यांच्या अचानक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अंत्य संस्कार दिनांक 22 रोजी मालाड स्मशान भूमीत करण्यात आलं. मोठ्या संख्येने लोक अंत्य यात्रेत उपस्थित होते