नवी दिल्ली : जानेवारीपर्यंतच्या कर संकलनात सातत्याने सकारात्मक वाढ होत आहे. या महिन्यात थेट अप्रत्यक्ष कराचा दर १६.९ टक्क्याने वाढला. जानेवारी महिन्यापर्यंत कर स्वरुपात एकूण ७.०३ लाख कोटी रुपये इतका महसूल प्राप्त झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण २३.९ टक्क्यांनी वाढले आहे.
जानेवारीपर्यंतच्या प्रत्यक्ष कर संकलनातही वाढ झाली आहे. या अवधीत ५.८२ लाख कोटी रुपये इतकी रक्कम प्रत्यक्ष करापोटी प्राप्त झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १०.७९ टक्क्यांनी वाढले आहे.