मुंबई : मेकअपमधील बारकावे, फॅशनचे ट्रेंड्स, मन आनंदी करणार्या स्किन केअर टिप्स या सेवा टाटा स्कायने सुरू केल्या आहे. त्यामुळे घरबसल्या सौंदर्यविषयक माहिती उपलब्ध होणार आहे. टाटा स्काय या भारतातील आघाडीच्या कंटेट डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्मने एफ द काऊच (एफटीसी) ब्युटी स्टुडिओ या सुनील शेट्टी यांच्या उपक्रमासह भागीदारी करत ही नवीन इंटरऍक्टिव्ह सेवा सुरू केली आहे.
टाटा स्काय ब्युटी सौंदर्य मंत्र घरात आणेल. मेकअपच्या ट्रिक्स, स्किनकेअर,नवनव्या फॅशन ट्रेण्ड्सबद्दल माहिती मिळेल. एफटीसी ब्युटी स्टुडिओच्या सहकार्याने टाटा स्काय ब्युटीवर भरत ऍण्ड डोरीस, अंबिका पिल्लई, सुभाष सिंग, शान मू, आलिम हकीम, अंजू मोदी, तरुण ताहिलिआनी, कविता भारतीय, पायल जैनयांसारखे सेलिब्रिटी मेकअप एक्सपर्ट आणि स्टायलिस्ट तसेच डॉ. स्वाती महेश्वरी यांच्यासारखे स्किन केअर एक्सपर्ट मिळून तुमच्या दिवाणखानाच्या आरामदायी वातावरणात बॉलिवुडचे ग्लॅमर निर्माण करतील. श्रुती आनंद, नूरिन शा, हेशा चीमा यांसारखे सोशल मिडियावरील तज्ज्ञही उपलब्ध असतील.
आजघडीला, ब्युटी, मेकअप, फॅशन आणि स्किनकेअर संदर्भात प्रत्येकासाठी २४x७, नॉन–स्टॉप उपलब्ध असणारी ही एकमेव सेवा आहे. या सेवेतील एक अनोखा भाग म्हणाजे यात किड्स स्पेशलविभागात मुलांच्या हेअर स्टाइल आणि फॅशन ट्रेण्ड्ससंदर्भात अपडेट्स दिले जातील. या सेवेत ‘जिंदगी खुबसुरत है‘ हा संडे स्पेशल कार्यक्रम आणि टीव्ही कलाकारांच्या दैनंदिन आयुष्यात डोकावूनपाहण्याची संधी देणारा ‘सास, बहु और ब्युटी‘ हा आगळावेगळा कार्यक्रमही असेल.
टाटा स्काय ब्युटीच्या शुभारंभप्रसंगी टाटा स्कायच्या मुख्य व्यावसायिक अधिकारी पल्लवी पुरी म्हणाल्या, “सबस्क्राइबर्सना त्यांच्या आवडत्या विषयांमध्ये नवे काही शिकण्यासाठी, वाढ आणिसुधारणा करण्यासाठी प्रोत्साहित करणार्या आणि प्रेरणा देणार्या इंटरऍक्टिव्ह म्हणजेच परस्परसंवादी सेवा टाटा स्कायने नियमित सादर केल्या आहेत. टाटा स्काय ब्युटी ही सेवा ग्रूमिंग, स्टायलिंगआणि काळजी घेण्यातील कौशल्ये वाढवण्यासाठी आणि महिलांना कायमच छान वाटावे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा, यासाठी तयार करण्यात आली आहे. सौंदर्याची ही अनोखीपाककृती तयार करण्यासाठी टाटा स्कायने एफटीसी ब्युटी स्टुडियोशी हातमिळवणी केली आहे. या स्टुडिओच्या माध्यमातून सौंदर्य आणि फॅशन क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञ या सेवेत उपलब्ध होतील.”
या उपक्रमाबद्दल सुपरस्टार सुनील शेट्टी म्हणाले, “टाटा स्कायसोबत फिटनेस आणि ऍक्टिंग अड्डा सुरू केल्यानंतर आता मी टाटा स्कायसोबत एफटीसी ब्युटी स्टुडिओच्या रुपाने आणखी एक सहयोग जोडण्यास उत्सुक आहे. देशातील प्रत्येक घरात कौतुक होईल आणि उपयुक्त ठरेल, अशी ही सेवा आहे.”
एफटीसी टॅलेंट मिडिया ऍण्ड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सहसंस्थापक आाणि सीईओ अक्षय वत्स म्हणाले, ”नाविन्यपूर्ण कंटेटची निर्मिती करणे आणि आमच्या वापरकर्त्यांना आमच्या सेवा सहज उपलब्धकरून देणे, हेच एफटीसीमध्ये आमचे कायम उद्दिष्ट राहिले आहे. हाच विचार पुढे नेत, आता फॅशन आणि ब्युटी क्षेत्रातील सर्वोत्तम तज्ज्ञांसह आपली स्वत:ची ब्युटी रेसिपी तयार करणे प्रेक्षकांनाशिकवणे आणि त्यांना सक्षम करणे यासाठी टाटा स्काय ब्युटीसोबत एफटीसी ब्युटी स्टुडिओची सुरुवात करताना आम्हाला आनंद होत आहे.”