नवी मुंबईत टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कार बघण्यासाठी होत आहे गर्दी
नवी मुंबई – टाटा मोटर्सने गौरवलेली व अधिकृत विक्रेता असलेल्या फॉर्च्युन कार्सने नवी मुंबईतील वाशी येथे टाटा मोटर्सचे नवीन दालन सुरु केले असून या शोरूम मध्ये सफारी, हॅरियर, नेक्सन आणि अल्ट्रोज टियागो आणि टिगोर या टाटा समूहाच्या लोकप्रिय कार येथे पाहायला मिळणार आहे. फॉर्च्यून कारचे हे दुसरे शोरूम असून वाशीतील पाम बीच रोडवरील सत्रा प्लाझा इथे सुरु केलेले हे शोरूम अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून ते ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास फॉर्च्युन कार्सने व्यक्त केला आहे. या नव्या शोरूममध्ये ग्राहकांसाठी वाय-फाय कनेक्टिव्हिटी, व्हायब्रंट डिस्प्ले क्षेत्र आणि ग्राहकांना परस्पर संवाद साधण्यासाठी पुरेशी जागा असलेले ग्राहक लाऊंज क्षेत्र आहे. शोरूममध्ये विक्री प्रतिनिधी आणि सहाय्यक कर्मचारी यांची एक टीम देखील आहे जी ग्राहकांना वित्त, विमा व कार डिजाईन यासारख्या वाहन खरेदी सेवांमध्ये मदत करणार आहे.
यावेळी बोलताना फॉर्च्युन कार्सचे चेअरमन श्री विनोद शर्मा म्हणाले, “ कार खरेदी करणे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि ती आयुष्यातील एक विशेष आठवण असते म्हणूनच आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सर्वोत्तम सेवा आणि खरेदी करण्याचा अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न करणार आहोत. टाटा हा एक लोकप्रिय ब्रांड आहे आणि आम्हाला २१ वर्षाहून अधिक काळ कंपनीशी संबंधित असल्याचा आम्हाला अभिमान आहे. टाटा मोटर्स आणि फॉर्च्युन कार्स यांचे मिश्रण विश्वास, व गुणवत्ता यांचे प्रतीक आहे. आमची संपूर्ण प्रशिक्षित टीम ग्राहकांना एक चांगला अनुभव देण्यासाठी तयार आहे . येणारा कालावधी हा सणांचा कालावधी आहे व या काळात ग्राहकांना चांगली सेवा मिळावी हाच आमचा मुख्य उद्देश आहे.”
या नवीन शोरुमचे उद्घाटन टाटा मोटर्सच प्रवासी वाहने व्यवसाय युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा, फॉर्च्युन कार्सतर्फे विनोद शर्मा, अभिजित भन्साळी (व्हाईस चेअरमन) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित होते. फॉर्च्युन कार्सचे मुख्यालय नेरुळ नवी मुंबई येथे आहे. फॉर्च्युन कार प्रायव्हेट लिमिटेड दोन दशकांहून अधिक काळ टाटा मोटर्सचे अधिकृत डीलर आहे , लवकरच ते ऐरोली येथे एक शोरूम सुरू करणार असून कामोठे आणि उलवेमध्ये आणखी २ शोरूमसाठी टाटा मोटर्ससोबत त्यांची चर्चा सुरु आहे. सध्या नेक्सन ईव्ही ही इलेक्ट्रिक कार नवी मुंबईतल्या कार प्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. भारतातील ईलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातचे नेतृत्त्व टाटा मोटर्स करणार आहे. २०२५ पर्यत टाटा मोटर्सकडे १० नव्या ईलेक्ट्रिक गाड्या असणार आहेत.