नवी दिल्ली : पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघालेली भारतीय नौदलाची तारिणी नौका ल्यॅटेल्टॉन (न्यूझीलंड) बंदरावर पोहोचली. सर्व महिला खलाशी असलेली ही भारताची पहिलीच सागरपरिक्रमा आहे. जहाजाच्या कप्तान लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी असून अन्य सदस्यांमध्ये लेफ्टनंट कमांडर्स प्रतिभा जमवाल, पी. स्वाती आणि आणि लेफ्टनंट एस. विजयादेवी, बी. ऐश्वर्या आणि पायल गुप्ता आहेत.
10 स्पटेंबर 2017 ला संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयएनएसव्ही तारिणीला हिरवा झेंडा दाखवला होता. जहाजाने गोव्यापासून निघून आतापावेतो 7,800 नॉटिकल मैलाचे अंतर पार केले असून पाच टप्प्यांपैकी ल्यॅटेल्टॉन हा दुसरा टप्पा आहे. ल्यॅटेल्टॉन येथून जहाज 12 डिसेंबर 2017 ला पुढच्या प्रवासासाठी निघण्याची शक्यता आहे.
प्रदक्षिणेदरम्यान महासागरी हवामान, सागरी प्रवाह आणि सागरी प्रदूषणविषयक माहिती गोळा करत आहेत. तसेच खोल समुद्रातल्या प्रदूषणाबाबतही नोंदी घेत आहे. थांब्यादरम्यान खलाशी स्थानिक नागरिकांशी विशेषत: मुलांशी संवाद साधतील तसेच धाडसी मोहिमांना, महासागर परिक्रमेला प्रोत्साहन देतील.
या मोहिमेद्वारे “मेक इन इंडया” आणि भारतीय नारी शक्तीचे जागतिक स्तरावर प्रदर्शन होत आहे.