रत्नागिरी, (आरकेजी) : पारंपारिक मच्छिमारांसाठी आमदार नितेश राणे यांनी केलेले आंदोलन म्हणजे स्टंटबाजी आहे, अशी टीका अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केली. मच्छिमार मेळाव्यासाठी रत्नागिरीत ते आले होते.
पारंपारिक मच्छिमार आणी पर्ससीन नेट धारक यांच्यात मासेमारीवरून वाद धुमसतो आहे. आमदार नितेश राणे यांनीही या वादात उडी घेतली आहे. मच्छिमारांना न्याय कधी मिळणार? असा जाब त्यांनी मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांना विचारला. यावेळी राणे यांनी आयुक्तांवर मासा फेकून मारला होता. या मासेफेक आंदोलनाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती आणि राणे चर्चेत आले होते. यावर तांडेल यांनी टिका केली आहे.
यापूर्वी नितेश पारंपारिक मच्छिमारांच्या बाजुने कधीही उभे राहिले नाहीत. आता पारंपरिक मच्छिमार दुरावत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. म्हणूनच त्यांनी अधिकाऱ्यावर मासा फेकून प्रसिद्धीचा स्टंट केला, असे तांडेल म्हणाले आहेत. स्टंटबाजीच जर करायची असेल मच्छिमारांच्या खांद्याला खांदा लावून लढा, असे आव्हानच तांडेल यांनी राणेंना दिले आहे.