
रत्नागिरी : ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनामध्ये आज संमेलनाचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत ऐकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत दै. सकाळचे माजी संपादक श्री यमाजी मालकर हे डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. तरी शेती व सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी ९.०० वाजल्यापासून पूर्ण दिवस उपस्थित राहून वेगवेगळ्या परिसंवादांमधील ज्येष्ठ साहित्यिकांचे विचारांचा आस्वाद घ्यावा, असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे..















