
मुंबई : सेन्होरा डिसूझा आणि पार्थव केळकर यांनी मलबार हिल क्लब थ्री स्टार मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष एकेरी गटाचे जेतेपद मिळवले. मलबार हिल क्लब टेबल टेनिस हॉलमध्ये ही स्पर्धा पार पडली.
अव्वल मानांकित सेन्होरा डिसूझाने दुस-या मानांकित मिसबाह सुमेरला सरळ तीन सेटमध्ये 11-8, 13-11, 12-10 असे नमवित महिला गटाचे जेतेपद मिळवले. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात दुस-या मानांकित पार्थवने अव्वल मानांकित तन्मय राणेला चुरशीच्या झालेल्या सामन्यात 12-10, 7-11, 11-8, 20-18 असे पराभूत केले.
मुलांच्या युथ गटातील एकेरीच्या सामन्यात मुदीत दानीने तन्मय राणेला चुरशीच्या लढतीत नमविले. 1-2 अशा पिछाडीनंतर दानीने जोरदार पुनरागमन करत 6-11, 11-4, 8-11, 11-2, 11-8 असा विजय मिळवला. दरम्यान हिया दोशीने मुलींच्या ज्युनियर एकेरी व युथ एकेरी गटाचे जेतेपद मिळवले. मुलींच्या ज्युनियर गटात हियाने अमिरा झवेरीला 11-7, 11-4, 11-6 असे पराभूत केले. तर, युथ गटामध्ये तिने क्रिशा अग्रवालला 8-11, 14-12, 8-11, 11-8, 11-7 असे नमविले.
………………………
– कॅडेट मुली एकेरी : प्रिशा शाह वि.वि. अंशिता ताम्हणकर 11-9, 11-13, 11-5, 9-11, 11-9
– कॅडेट मुले एकेरी : वेदांत अग्रवाल वि.वि. पार्थ मगर 11-8, 11-4, 11-5
– मिडेट मुले एकेरी : अर्णव वाघ वि.वि. श्लोक झवेरी 11-6, 13-11, 11-6
– सब ज्युनियर मुली एकेरी : केईशा झवेरी वि.वि. अमिरा झवेरी 11-6, 11-9, 11-5
– सब ज्युनियर मुले एकेरी : ओम चोपडे वि.वि. दियान शाह 9-11, 14-12, 11-5, 11-13, 11-5
– ज्युनियर मुली एकेरी : हिया दोशी वि.वि. अमिरा झवेरी 11-7, 11-4, 11-6
– ज्युनियर मुले एकेरी : मंदार चिपळूणकर वि.वि. ज्ञानेश सावंत 12-10, 11-3, 11-6
– युथ मुली एकेरी : हिया दोशी वि.वि. क्रिशा अग्रवाल 8-11, 14-12, 8-11, 11-8, 11-7
– युथ मुले एकेरी : मुदीत दानी वि.वि. तन्मय राणे 6-11, 11-4, 8-11, 11-2, 11-8
– महिला एकेरी : सेन्होरा डिसूझा वि.वि. मिसबाह सुमेर 11-8, 13-11, 12-10
-पुरुष एकेरी : पार्थव केळकर वि.वि. तन्मय राणे 12-10, 7-11, 11-8, 20-18
– वेट्रन्स एकेरी : रवी चोपरा वि.वि. प्रसाफ नाईक 13-11, 14-16, 5-11, 11-6, 11-7

















