रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी)- रत्नागिरी येथील वात्सल्य-स्नेह संचलित गुरुवर्य विश्वाराध्य ऊर्फ बाळासाहेब हिरेमठ परफॉर्मिंग आर्टस् अॅकॅडमी आणि रत्नागिरी र्हिदम संकल्पनेअंतर्गत रोहन सावंत गौरव तबलावादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी २८ ऑगस्ट रोजी थिबा पॅलेस रोड येथील जयेश मंगल पार्कमध्ये ही स्पर्धा होणार आहे. कार्यक्रमाला नगराध्यक्ष राहुल पंडित उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी 7 वाजता बक्षीस वितरण होईल. यानंतर परीक्षक व स्थानिक कलाकारांचे सादरीकरण होईल.
कार्यक्रमासाठी प्रमुख सहाय्य स्वराभिषेक, हेरंब जोगळेकर, विजय रानडे, पांडुरंग बर्वे यांचे लाभले आहे. या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अॅकॅडमीचे कार्याध्यक्ष विष्णू सागवेकर, प्रमुख समन्वयक सायली रेडीज, मुख्य कार्यक्रम संयोजिका विनया परब, तबला विभागप्रमुख प्रथमेश शहाणे, वात्सल्य स्नेहचे प्रमुख अॅड. राजशेखर मलुष्टे यांनी केले आहे.