मुंबई : मानखुर्दमधील एका चित्रकाराने एक टीशर्ट बनवले आहे. या टी शर्टवर मास्क घातलेली महीला डॉक्टर प्रातिनिधिक स्वरुपात भवानी मातेच्या रूपात दाखवण्यात आली आहे. जिच्या हातात असणारे त्रिशूळ घेऊन ती कोरोना नावाच्या राक्षसाला मारत असल्याचा देखावा साकारला आहे. तसेच ‘संकट समयी वैद्यरूपी भवानी उभी आपल्यासाठी’ मानाचा सलाम, असा संदेश देण्यात आला आहे.
पुष्पराज तारी असे या कलाकाराचे नाव आहे. कोरोना नावाचा राक्षसाचा खात्मा करण्यासाठी महिला डॉक्टर आपल्यासाठी लढत आहेत, त्यांना सलाम करण्यासाठी हा देखावा चित्राच्या माध्यमातून टी शर्टवर रेखाटला, असे पुष्पराज याने सांगितले.
स्वच्छतादूतांचेही साकारलेले चित्र :