मुंबई : महापालिका निवडणुकीत मुलुंड पूर्व आणि पश्चिम येथे भाजपाने मोठे यश संपादन केले. सर्वच राजकीय विरोधकांना धूळ चारून भाजपाचे सहाच्या सहा उमेदवार येथून निवडून आले. यामुळे मुलुंड हा भाजपचा बालेकिल्लाच आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. सर्व विजयी उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला. निल सोमय्या, मनोज कोटक, प्रकाश गंगाधरे, समिता कांबळे, रजनी केणी, प्रभाकर शिंदे या विजयी उमेदवारांसह खासदार किरीट सोमय्या, आमदार सरदार तारासिंग यावेळी उपस्थित होते.