मुंबई : स्वयंपाकाच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत १ मार्च पासून ८६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एलपीजी उत्पादनांच्या जागतिक किंमतीतल्या वाढीमुळे ही वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली. मात्र अनुदानित दराने गॅस सिलेंडरचा रिफील करणाऱ्या ग्राहकांवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
नवी दिल्लीत नव्या एलपीजी रिफीलसाठी ग्राहकांना ७३७ रुपये द्यावे लागतील आणि त्यांच्या खात्यात ३०३ रुपयांचे अनुदान जमा होईल. म्हणजेच ग्राहकांना पूर्वीप्रमाणे एकूण ४३४ रुपये द्यावे लागतील, ज्यात कोणताही बदल होणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे विना अनुदानित एलपीजी गॅस सिलेंडर रिफील करणाऱ्या ग्राहकांवर, या सिलेंडरच्या किंमतीत झालेल्या वाढीचा कोणताही परिणाम होणार नाही.