मुंबई : राज्याचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त बनण्याचा मान माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना मिळाला. त्यांनी आज आयुक्तपदाची शपथ घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे सकाळी अकराच्या सुमारास हा शपथविधी सोहळा झाला.
राज्यपालांनी शपथविधीसाठी प्राधिकृत केलेले लोकायुक्त एम.एल.टहलियानी यांनी क्षत्रिय यांना आयुक्तपदाची शपथ दिली. मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी नेमणुकीची अधिसूचना आणि राज्यपालांनी लोकायुक्तांना प्राधिकृत केलेल्या पत्राचे वाचन केले.
राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त पदाचा कालावधी 5 वर्षांचा असणार आहे. शपथविधी सोहळ्यास माजी मुख्य माहिती आयुक्त सुरेश जोशी यांच्यासह राज्य प्रशासनातील विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.