नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्रातील ४ संस्थांना केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) गिरीराज सिंह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.येथील प्रवासी भारतीय भवनात केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ६ श्रेणींमध्ये एकूण १८ पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील ४ संस्थांना यावेळी सन्मानित करण्यात आले. मंत्रालयाचे सचिव अरुण पांडा व अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.देशभरात १६ ते ३० जून २०१८ दरम्यान केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. पंधरवड्या दरम्यान उत्कृष्ट ठरलेल्या संस्थांचा या पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला.